1 May 2025 8:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Platform Train Ticket | आता रेल्वे प्रवाशांना फक्त प्लॅटफॉर्म तिकाटावर करता येणार ट्रेनने प्रवास, हा महत्वाचा नियम लक्षात ठेवा

Platform Train Ticket

Platform Train Ticket | काही वर्षांपूर्वी रेल्वेने प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म तिकीट बंधनकारक केले. त्यामुळे रेल्वेने प्रवास करायचा नसेल मात्र तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी अथवा कोणत्या अन्य कारणासाठी प्लॅटफॉर्म येणे गरजेचे असल्यास पॅटफॉर्म तिकीट झाले. याचा अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला प्रवास करायचा नाही तरी तिकीट काढायचे हे काहींना मान्यच नव्हते. मात्र आता हा नियम सुरु होऊन ७ ते ८ वर्षांचा काळ लोटला आहे. त्यामुळे या नियमाचा आता मोठा देखील होत आहे.

या नियमात रेल्वेने प्रवाशांना एक मुभा दिली आहे. ती म्हणजे रेल्वेचे तिकीट नसेल तरी तुम्ही त्याने प्रवास करू शकता. अनेकांना या नियमाची निट माहिती नाही. या नियमात रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट तुम्हाला कोणत्याही ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवाणगी देते.

सहसा प्रवास करताना आपण रेल्वेचे तिकीट आधीच रिझर्व करून ठेवतो. मात्र सर्व सिट बूक झाल्यावर तिकीट मिळत नाही. त्यामुळे अनेकांना प्रवास टाळावा लागतो. मात्र आता तुम्हाला रेल्वेचे तिकीट मिळाले नाही तरी रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीटावर प्रवास करता येणार आहे. यासाठी तुमच्याकडून कोणताही अतिरिक्त दंड आकारला जाणार नाही.

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीटावर प्रवास करताना रेल्वेमध्ये गेल्यावर सर्वात आधी TTE ला गाठा. त्यांना तुमच्या प्रवासाची माहिती द्या. नंतर TTE तुम्हाला ज्या ठिकाणा पर्यंत प्रवास करायचा आहे त्याचे तिकीट देतो. असे करूण तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी वेळेत पोहचू शकाल.

यात ट्रेनमध्ये जागा रिकामी नसेल तर TTE सीट मिळवून देण्यास नकार देत नाहीत. ते पुढील दोन स्थानके गेल्यावर उपलध्द सीट तुम्हाला देतात. यात २५० रुपये तिकीटा व्यतीरीक्त दंड स्वरुपात घेतले जातात. ज्या ठिकाणाहून तुम्ही ट्रेनमध्ये चढले आहात. त्याच स्थानकाचे प्लॅटफॉर्म तिकीटा तुमच्याकडे असायला हवे. तसेच तुम्ही ज्या वर्गात प्रवास करत आहात त्याचेच भाडे तुमच्याकडून घेतले जाईल.

जर प्रवासात तुमची ट्रेन चुकून सुटली तर तुमची सीट गेली असे होत नाही. TTE पुढील दोन स्थानके तुमची सीट कुणाला देत नाही. त्यामुळे ट्रेनच्या वेळेत तुम्ही पुढील स्थानक गाठून ट्रेन पकडू शकता. मात्र दोन स्थानके तुम्ही आले नाही तर तुमची सीट इतर कोणालाही दिली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Platform Train Ticket Train travel can be done only on platform tickets 17 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Platform Train Ticket(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या