
Railway Ticket Booking | सणासुदीच्या दिवसांमध्ये ट्रेनचे तिकीट मिळणे थोडे कठीण होऊन जाते. लाखो प्रवासी सणासुदीच्या काळात प्रवास करण्यासाठी बाहेर पडतात. परंतु प्रचंड प्रमाणात गर्दी आणि जास्त प्रवासी असल्यामुळे तुम्हाला तिकीट मिळणे थोडे कठीण होते. परंतु रेल्वेच्या एका सुविधेमध्ये कोणत्याही प्रवाशाला अगदी 10 मिनिटांमध्ये आवडीचे तिकीट बुक करता येऊ शकते.
केवळ फेस्टिवल सीजनच नाही तर, इमर्जन्सीच्या काळात किंवा आपल्याला तातडीने एखाद्या शहरी जायचं असेल तर, कमी पैशांमध्ये सर्वसामान्यांना परवडणारा एकच पर्याय तो म्हणजे ट्रेन. तुम्ही अगदी 10 मिनिटांआधी देखील तिकीट बुक करू शकता.
दहा मिनिटांत तिकीट बुक करून हवं असेल तर, तुम्हाला रेल्वेच्या करंट तिकीट सुविधेचा लाभ घेता येऊ शकतं. त्याचबरोबर रेल्वेच्या या करंट तिकीट सुविधेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
अशा पद्धतीने मिळेल 10 मिनिटात सीट :
1) करंट तिकीट सुविधामध्ये सामान्य तिकिटाच्या स्वरूपात मूल्य कमी आकरले जाते. म्हणजेच तुम्ही तुमच्या इमर्जन्सी काळात करंट तिकीट बुक करून स्वतःचा फायदा करून घेऊ शकता.
2) तुम्हाला करंट तिकीट बुक करायचं असेल तर, आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा स्टेशनवर उपलब्ध असणाऱ्या तिकीट काउंटरवरून देखील सीट बुक होऊ शकते.
3) करंट तिकीट सुविधेअंतर्गत तुम्हाला 3 ते 4 तास आधी तिकीट बुक करण्यासाठी परवानगी दिली जाते. करंट तिकीट सुविधांमध्ये तुम्हाला ट्रेनमधील रिकामी सीटे भरण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. यामुळे ट्रेन रिकामी देखील जात नाही त्याचबरोबर तुमचा आणि ट्रेनचा दोघांचाही सारख्या प्रमाणात फायदा होतो.