
Railway Ticket Booking | भारतीय रेल्वेमधून कोटींच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. भारतीय रेल्वेने स्वतःचा स्पेस प्रचंड प्रमाणात वाढवला आहे. अगदी लहान गावांमध्ये देखील रेल्वेच्या माध्यमातून व्यक्ती सहजपणे पोहोचू शकतो. सर्वसामान्यांसाठी रेल्वे हे ट्रान्सपोर्टचे महत्त्वाचे आणि फायद्याचे साधन आहे आणि म्हणूनच लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. परंतु जनरल कोचमध्ये प्रत्येक वेळी प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
अति सामान्य व्यक्ती जनरल कोचची तिकीट बुक करून प्रवास करतात. अशातच एका ट्रेनमध्ये जनरल, AC, अप्पर क्लास, त्याचबरोबर विविध सुविधा असणाऱ्या सीट उपलब्ध असतात. परंतु अनेकांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित होत असतो की, जनरल तिकीट असणारा व्यक्ती अप्पर क्लास किंवा AC कोचमधून प्रवास करू शकतो का. तर याचे उत्तर आहे होय. ही गोष्ट केवळ एका कारणामुळे शक्य होऊ शकते.
कारण जाणून घ्या :
बऱ्याचदा रिझर्व कोचमधील काही सीट रिकाम्या राहून जातात. अशातच एकीकडे जनरल कोचमध्ये अक्षरश: कोचून आणि धक्काबुक्की करत प्रवास करावा लागतो. अशावेळी टीटीईशी संपर्क साधून तुम्ही तुमचं तिकीट जनरल टू अप्पर क्लास करून घेऊ शकता. यासाठी टीटीई तुमच्याकडून दोन्हीही तिकिटांच्या मधली रक्कम घेऊ शकतो. तुम्हाला टीटीईबरोबर चांगली डील करून घ्यावी लागेल.
अशा पद्धतीने तिकीट चेंज करा :
समजा तुम्ही जनरल कोचमध्ये प्रवास करत असाल तर, तुम्ही तिकीट बदलून ऐसी कोच किंवा स्लीपर कोच घेऊ शकता. समजा तुमच्याबरोबर तुमचे वयस्कर आई वडील असतील तर त्यांच्यासाठी ही गोष्ट अत्यंत फायद्याची ठरू शकते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.