1 May 2025 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्लीपर कोच तिकिटावर AC कोचमधून प्रवास करू शकता - Marathi News

Highlights:

  • Railway Ticket Booking
  • रेल्वेची ऑटो अपग्रेड स्कीम :
  • अशा पद्धतीने केली जाते सीट अपग्रेड :
  • तिकीट अपग्रेडसाठी तुम्हाला विचारण्यात येईल :
  • महत्त्वाचं :
Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | तुमच्यामधील बरेचजण बाहेरगावी येण्या-जाण्यासाठी आणि लांबच्या पल्ला गाठण्यासाठी रेल्वेतून प्रवास करत असतील. आता रेल्वेतून प्रवास म्हटला तर, रेल्वेचं तिकीट बुक करणे देखील आलं. बऱ्याचदा सर्वसामान्य व्यक्ती स्लीपर क्लासचं तिकीट बुक करतात. परंतु ऐनवेळी त्यांचे टिकीट रेल्वेकडूनच AC3 कोचमध्ये अपग्रेड करण्यात येत. तुमच्यापैकी कोणासोबत तरी ही गोष्ट नक्कीच झाली असेल. त्यावेळी तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, आपण सामान्य तिकिटाचे पैसे भरून देखील रेल्वे आपल्याला उच्च दर्जाचे कोच का बरं देत आहे.

या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत नसतील तर हा लेख तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या ऑटो अपग्रेड स्कीमबद्दल माहिती सांगणार आहोत. ही माहिती तुमच्या फायद्याची ठरू शकते. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या भाग्यानुसार कमी पैशांत AC क्लासमधून सवारी करू शकता.

रेल्वेची ऑटो अपग्रेड स्कीम :
रेल्वेची ऑटो अपग्रेड स्कीम अत्यंत जबरदस्त स्कीम आहे. रेल्वेने अगदी विचारपूर्वक ही स्कीम बनवली आहे. समजा एखाद्या वेळेस ट्रेनमधील AC1, AC2, AC3 यांसारख्या अप्पर क्लास कोचचं तिकीट प्रत्येकालाच परवडत नाही. त्यामुळे बऱ्याचदा अपर क्लासच्या कोचमधील काही सीट रिकाम्या राहतात. या रिकाम्या सीटचा रेल्वेला चांगलाच फटका बसतो. त्यामुळे रिकामी ट्रेन घेऊन जाण्यापेक्षा आणि स्वतःच नुकसान करून घेण्यापेक्षा रेल्वेने ऑटो अपग्रेड स्कीम राबवली आहे. या स्कीममध्ये अपर क्लासमध्ये एखादी सीएट रिकामी तर, लोअर क्लासमधील पॅसेंजरला अप्पर क्लासमध्ये शिफ्ट करण्यात येते म्हणजेच ऑटो अपग्रेड करता येते. असं केल्याने रेल्वेला फायदेच फायदे अनुभवता येतात.

अशा पद्धतीने केली जाते सीट अपग्रेड :
समजा फर्स्ट एसीमध्ये 4 पॅसेंजरची सीट रिकामी आहे आणि सेकंड एसीमध्ये 2 पॅसेंजरच्या सीट रिकाम्या आहेत तर, सेकंड एसीमधील काही पॅसेंजरच्या अपग्रेड करून त्यांना फर्स्ट एसीमध्ये शिफ्ट करण्यात येते. त्याचबरोबर सेकंड एसीमध्ये थर्ड एसीमधील पॅसेंजरला शिफ्ट केले जाते. असं केल्याने रेल्वेच्या सर्व सीट भरल्या जातात. पॅसेंजरच्या सीटचं व्यवस्थित नियोजन केल्यानंतर थर्ड एसीमध्ये वेटिंग लिस्टवर असणाऱ्या व्यक्तींना पटापट जागा मिळते आणि अशाप्रकारे रेल्वेच्या कोचमधील सर्व जागा भरल्या जातात.

तिकीट अपग्रेडसाठी तुम्हाला विचारण्यात येईल :
तुम्ही बाहेरगावी जाण्यासाठी जेव्हा तिकीट बुक कराल त्याचवेळी तुम्हाला IRCTC कडून असं विचारण्यात येईल की, तुम्ही तुमचं तिकीट ऑटो ऑफ ग्रेड करण्यासाठी तयार आहात का. जर तुम्ही हो बोलला तरच तुमचं तिकीट अपग्रेड करण्यात येईल. जर तुम्ही तिकीट अपग्रेड करण्यासाठी नकार दिला तर तुमचं तिकीट अपग्रेड करणार नाही. परंतु तुम्ही हो किंवा नाही असं कोणतही उत्तर दिलं नाही तर, तुम्ही ऑटो अपग्रेडसाठी तयार आहात असं समजण्यात येईल. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.

महत्त्वाचं :
बऱ्याच व्यक्तींना आपले तिकीट अपग्रेड झाल्यामुळे आपला PNR बदलेल की काय अशी शंका वाटते. परंतु असं अजिबात होत नाही. जर तुमचं तिकीट अपग्रेड झालं आणि तुमचं मूळ तिकीट कॅन्सल झालं तर, तुम्हाला मूळ तिकिटा नुसार रिफंड केले जाणार.

Latest Marathi News | Railway Ticket Booking 28 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(70)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या