
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी अल्प खरेदी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स जुलै महिन्यात 229 रुपये या सर्वकालीन उच्चांक किंमत (NSE: IRFC) पातळीवर पोहोचले होते. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली सुरू झाली होती. मागील 30 दिवसात या कंपनीचे शेअर्स जवळपास 13 टक्के घसरले आहेत. (आयआरएफसी कंपनी अंश)
IRFC स्टॉक अजूनही ओव्हरव्हॅल्युएड
सध्या अनेक गुंतवणूकदार आयआरएफसी स्टॉकमध्ये एंट्री पोझिशन घेण्यासाठी स्टॉक प्राईस बॉटम गाठण्याची वाट पाहत आहेत. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 0.032 टक्के वाढीसह 156.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी घसरण पाहायला मिळू शकते. आयआरएफसी स्टॉक अजूनही 158-160 रुपये श्रेणीत ओव्हरव्हॅल्युएड आहे.
तज्ज्ञांनी काय म्हटले?
शेअर बाजारातील तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 115 रुपये ते 125 रुपये या रेंजमध्ये येऊ शकतात. तज्ञांच्या मते, या रेंजमध्ये एंट्री पोझिशन घेणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते आयआरएफसी कंपनीच्या स्टॉकमध्ये जवळपास 50 टक्के पुलबॅक पाहायला मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.