
Railway Ticket Booking | भारतीय रेल्वेने गेल्या सात वर्षांत लहान मुलांच्या प्रवास भाड्याच्या नियमांमध्ये बदल करून अतिरिक्त 2800 कोटी रुपये कमावले आहेत. आरटीआयच्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे. सुधारित निकषांमुळे केवळ या आर्थिक वर्षात 560 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून हे वर्ष सर्वाधिक फायदेशीर ठरले असल्याचे सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्सने (CRIS) माहितीच्या अधिकारात म्हटले आहे.
रेल्वे मंत्रालयाने ३१ मार्च २०१६ रोजी घोषणा केली होती की, पाच वर्षे ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना स्वतंत्र बर्थ किंवा आरक्षण कोचमध्ये जागा हवी असल्यास रेल्वे पूर्ण भाडे आकारेल. हा नियम 21 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आला होता. यापूर्वी ५ ते १२ वयोगटातील मुलांसाठी स्वतंत्र बर्थ बुक करण्यासाठी रेल्वे अर्धे भाडे आकारत होती.
सात वर्षांत १० कोटी मुलांसाठी स्वतंत्र बर्थ बुक
मात्र, ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलाने स्वतंत्र बर्थ शिवाय प्रवास करणाऱ्या प्रौढ व्यक्तीच्या बर्थवर प्रवास केल्यास त्याला अर्धे भाडे भरावे लागणार आहे. क्रिसने दिलेल्या माहितीनुसार, सात वर्षांत ३.६ कोटींहून अधिक मुलांनी अर्धे भाडे भरून राखीव जागा किंवा डब्यांची निवड न करता प्रवास केला.
रेल्वेमध्ये मुलांसाठी तिकीट बुक करण्याचा नियम काय आहे?
1 वर्ष ते 4 वर्षे वयोगटातील मुलाने रेल्वेत प्रवास केल्यास त्याला राखीव डब्यात आरक्षण करण्याची गरज नाही. ५ वर्षांखालील मुले विनातिकीट ट्रेनमध्ये प्रवास करू शकतात. मात्र, ५ ते १२ वयोगटातील मुलाला स्वतंत्र राखीव जागा घ्यावी लागत नसेल तर त्याला अर्धे भाडे भरून आई किंवा वडील किंवा त्याच्यासोबत असलेल्या कोणत्याही प्रवाशाच्या सीटवर प्रवास करता येणार आहे.
मुले मोफत प्रवास करू शकतात?
त्याचबरोबर पालकांनी ५ ते १२ वयोगटातील मुलासाठी स्वतंत्र बर्थ बुक केल्यास त्यांना तिकिटाचे पूर्ण भाडे भरावे लागणार आहे. आरक्षण करताना 1 वर्ष ते 4 वर्षांपर्यंतच्या मुलाच्या नावाचा तपशील भरला असेल तर तुम्हाला पूर्ण भाडे भरावे लागेल. तसेच तपशील न भरल्यास १ वर्ष ते ४ वर्षे वयोगटातील मुले मोफत प्रवास करू शकतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.