9 October 2024 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
x

Railway Ticket Booking | ट्रेन सुरू होण्याच्या 10 मिनिटं आधी सुद्धा मिळते कन्फर्म सीट; 99% लोकांना माहित नाही

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याचदा एक्सप्रेस ट्रेनने प्रवास केला असेल दूर शहरी जाणाऱ्या एक्सप्रेससाठी आपल्याला एक ते दोन महिनेआधीच तिकीट बुक करून ठेवावी लागते. नाहीतर ऐन वेळेला सीट रिकामी नसते आणि आपलं जाणं कॅन्सल होतं. एरवी ठीक आहे पण जर तुमचं एखादं महत्त्वाचं काम असेल किंवा एखादी एमर्जन्सी असेल तर, ऐन वेळेला तिकीट मिळणे अवघड बनून जाते. परंतु आता चिंता करण्याची काही गरज नाही. कितीही एमर्जन्सी असो तुम्ही फक्त दहा मिनिटांमध्ये रेल्वे तिकीट बुक करू शकता.

रेल्वेने करंट तिकीट सुविधा उपलब्ध केली आहे. ज्यामध्ये तुम्ही फक्त दहा मिनिटांमध्येच रेल्वेचं तिकीट काढून आपली सीट बुक करू शकता.

अशा पद्धतीने करा तुमचं रेल्वे तिकीट बुक :
ट्रेन चालू व्हायच्या तीन ते चार तास आधीच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. यासाठी करंट तिकीट IRCTC ची साईट म्हणजेच ऑनलाइन तिकीट बुकिंग आणि विंडो तिकीट बुकिंग दोन्हीही सुरू केलं जातं. या तीन ते चार तासांमध्येच तुम्हाला तुमचं कन्फर्म तिकीट बुक करायचं आहे.

* ऑनलाइन टिकिट बुक करण्यासाठी वेबसाईटवर जाऊन तुमची संपूर्ण माहिती सांगून तिकीट कन्फर्म करू शकता.
* तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करता येत नसेल तर तुम्ही विंडो तिकीट देखील करंट तिकीट सुविधानुसार उपलब्ध करू शकता. परंतु करंट तिकीट बुक करण्यासाठी ट्रेनमध्ये जागा रिकामी असली पाहिजे.
* बऱ्याचदा हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. परंतु काही सीट रिकाम्या राहतात. या रिकाम्या सीट भरण्यासाठीच करंट तिकीट सुविधा उपलब्ध केली गेली आहे.
* विशेष म्हणजे या तिकिटाची किंमत सामान्य तिकिटाच्या किमतीपेक्षा दहा-वीस रुपयांनी स्वस्त असते.

नॉर्मल आणि एमर्जन्सी तिकीटमध्ये कोणता फरक आहे?
ट्रेन चालू होण्याआधी सामान्य तिकीट दरानुसार तुम्ही करंट तिकीट बुक करू शकता. फक्त ट्रेनमध्ये सीट रिकामी असली पाहिजे. तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. त्वरित तिकीट बुक करणे ही एक प्रीमियम सुविधा असून एक्स्ट्रा चार्जेस देऊन तुम्हाला कन्फर्म तिकीट बुक करावं लागतं.

महत्त्वाचं : करंट तिकीट बुकिंग ही सुविधा फक्त रेल्वेने ठरवलेल्या वेळापत्रकानुसारच सुरू असते. ज्यामध्ये ट्रेनच्या वेळेनुसार किंवा ट्रेन सुरू होण्याच्या दोन ते तीन तासआधी करंट बुकिंग सुविधा सुरू केली जाते.

News Title : Railway Ticket Booking Process for confirm Ticket 03 September 2024.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x