12 December 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा
x

Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 12 रुपये! तज्ज्ञांचा स्टॉक 'होल्ड' करण्याचा सल्ला, पुढे 100% परतावा देईल

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनी सध्या जबरदस्त आर्थिक संकटाना तोंड देत आहे. मात्र तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्समध्ये रिकव्हरी पाहायला मिळू शकते. ब्रोकरेज फर्म नुवामा सिक्युरिटीजने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर ‘होल्ड’ रेटिंग जाहीर केली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉक ‘गोइंग कंसर्न’ च्या मार्गावर आहे. म्हणजेच ही कंपनी व्यवसायात टिकून राहण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी अजूनही आर्थिक संकटातून बाहेर आलेली नाही. आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.39 टक्के घसरणीसह 12.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया स्टॉक ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसात या कंपनीचे शेअर्स 14 रुपये किमतीवर जाऊ शकतात. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया स्टॉक 2 टक्क्यांच्या वाढीसह 12.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जानेवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर 18.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 25 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

ब्रोकरेज फर्म सिटीने व्होडाफोन आयडिया लिमिटेड स्टॉकवर 15 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांच्या मते, तेजीच्या काळात या कंपनीचे शेअर्स 25 रुपये किमतीवर जाऊ शकतात. नुवामा फर्मच्या तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीचा भांडवली खर्च भारती एअरटेल लिमिटेड यासारख्या दिग्गज स्पर्धकांप्रमाणेच असणार आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने टॅरिफ वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीला एजीआरच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दूरसंचार सेवा आणि इतर निर्धारित सेवांच्या माध्यमातून दूरसंचार कंपन्यांनी कमावलेल्या कमाईला AGR म्हणतात. व्होडाफोन आयडिया कंपनीने नुकताच 18,000 कोटी रुपये मूल्याचा FPO पूर्ण केला आहे.

या FPO मधून जमा झालेला निधी कंपनी दूरसंचार बाजारात स्थिती मजबूत करण्यासाठी खर्च करणार आहे. या निधीमुळे व्होडाफोन आयडिया कंपनीला 4G आणि 5G सेवामध्ये सुधारणा करण्यास मदत होईल. काही रक्कम कंपनी आपल्या थकित कर्जाची परतफेड करण्यासाठी खर्च करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 09 May 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x