1 May 2025 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN
x

Railway Ticket Booking | 90 टक्के प्रवाशांना माहित नाही, पैसे न भरता बुक करा ट्रेनचे तिकीट, पैसे नंतर द्या

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | जर तुम्ही प्रवासाचा प्लॅन करत असाल पण तिकीट बुक करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. पैशांशिवायही तुम्ही तिकिट बुक करू शकता. भारतीय रेल्वेने ‘बुक नाऊ, पे लेटर’ (Book Now, Pay Later) ही सेवा सुरू केली आहे. याअंतर्गत प्रवाशांना तिकीट बुकिंगच्या काही दिवसांनंतरही पैसे भरता येणार आहेत. परंतु प्रवाशांना ही सुविधा केवळ ऑनलाइन बुकिंगवरच मिळणार आहे.

जर तुम्ही रेल्वेतून प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेचे नियम आणि सुविधांची ही माहिती असणं गरजेचं आहे. रेल्वे तिकीट बुकिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देते. त्यासाठी रेल्वेच्या ‘बुक नाऊ, पे लेटर’ सेवेविषयी माहिती असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे तिकीट बुक करण्यासाठी पैसे नाहीत, त्यांना रेल्वे ही सेवा देत आहे.

आयआरसीटीसीच्या ‘बुक नाऊ, पे लेटर’ सेवेचा वापर करून आरक्षण करता येईल, त्यासाठी नंतर पैसे भरण्याचाही पर्याय आहे.

तिकीट कसे बुक करावे?

पैसे न भरता तिकीट बुकिंग प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन होणार आहे. यामध्ये काही महत्त्वाचे नियम पाळावे लागतात. पे लेटर सेवेचा लाभ घेण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटच्या पेमेंट पेजवर ‘ईपेलेटर’ दिसेल.

एकदा आपण आपले तिकीट बुक करण्यासाठी ‘ePaylater’ निवडल्यानंतर, आपल्याला पेमेंट लिंकसह एक ईमेल आणि संदेश प्राप्त होईल. १४ दिवसांच्या आत पैसे भरता येतील. तसेच १४ दिवसांच्या आत पैसे न भरल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते किंवा तिकीट रद्द केले जाऊ शकते, असे नियमात स्पष्ट पणे नमूद करण्यात आले आहे.

जनरल तिकीट कसे बुक करावे

जनरल तिकीट बुक करण्यासाठी सर्वप्रथम आयआरसीटीसी अँप किंवा साइटवर लॉग इन करा. यानंतर बुक नाऊ चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला काही माहिती आणि कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर पेमेंट पेज ओपन होईल, ज्यामध्ये भीम अॅप, नेट बँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्डचा पर्याय दिसेल, ज्याद्वारे पेमेंटकरून तिकीट बुक करता येईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Railway Ticket Booking Saturday 25 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(70)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या