3 May 2025 3:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात

CM Mamata Banerjee

नवी दिल्ली, १७ मे | प. बंगालमधील निवडणूक संपून पुन्हा टीएमसीची बहुमताने सत्ता आली असून भाजपाची सर्व स्वप्नं भंगल्याने केंद्रीय गृह मंत्रालय पुन्हा जागं झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे भाजपचे नेते जसे सत्ता नसलेल्या राज्यात संबंधित राज्यपालांना भेटतात, त्याप्रमाणे सीबीआयने पश्चिम बंगालच्या राज्य सरकार ऐवजी राज्यपालांमार्फत धाड टाकण्यासाठी मान्यता घेतल्याचं वृत्त आहे.

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी नारद स्टिंग प्रकरणी फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चॅटर्जी यांच्याविरोधात खटला दाखल करण्याची परवानगी दिली होती. विशेष म्हणजे या धाड सत्रानंतर स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआय कार्यालयात दाखल झाल्या आहेत. राज्य सरकारची परवानगी न घेता कारवाई कशी काय केली असा जाब त्यांनी विचारला.

त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचं सरकार येताच सीबीआयने पुन्हा एकदा नारदा घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. आज सकाळी सीबीआयची एक टीम परिवहन मंत्री आणि कोलकाता पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरी पोहोचली. त्यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर त्यांना अटक करून सीबीआय आपल्यासोबत घेऊन गेली आहे. यावेळी हकीम यांनी मला नारदा घोटाळ्यात कोणत्याही नोटीशीशिवाय अटक केली जात असल्याचा दावा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच टीएमसी कार्यकर्त्यांनी हकीम यांच्या घरासमोर गर्दी केली असून सीबीआय विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

त्यानंतर सीबीआयची टीम सुब्रत मुखर्जी आणि मदन मित्रा यांना घेऊनही सीबीआय कार्यालयात आली. या चारही नेत्यांना नारदा घोटाळ्या प्रकरणी काही प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या चारही नेत्यांनी सीबीआयने आपल्याला अटक केल्याचा दावा केला आहे. तर सीबीआयने आम्ही या नेत्यांना अटक केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: West Bengal Governor Jagdeep Dhankhad had allowed the case to be filed against Firhad Hakeem, Subrata Mukherjee, Madan Mitra and Sovan Chatterjee in the Narad sting case. Chief Minister Mamata Banerjee herself has entered the CBI office after the raid. He asked how the action was taken without the permission of the state government.

News English Title: Chief Minister Mamata Banerjee herself has entered the CBI office after the raid news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या