रश्मी शुक्ला या बिल्डरांकडून खंडणी घेत | त्यांना फडणवीसांचे पाठबळ होते - हरिभाऊ राठोड
मुंबई, २६ मार्च: सध्या राज्यात फोन टँपिंग प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात राज्य सरकारला मुख्य सचिवांनी अहवाल सादर केल्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे रश्मी शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने गृह विभागाकडून मान्यता घेतली होती आणि तीच त्यांनी सरकार विरोधात वापरल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र आता रश्मी शुक्ला यांचावर अजून आरोप होण्यास सुरुवात झाली आहे.
कारण सध्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना खंडणी गोळा करायच्या, असे त्यांनी म्हटले आहे. पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्यामार्फत हा सारा कारभार सुरु होता. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर पडदा टाकला, असे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबद्दल वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर बिल्डरांकडून खंडणी घेत असल्याचे धक्कादायक आरोप केले. पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ पोलिसांनी प्रॉपर्टी सेलमध्ये बोलावून धमकावत असत. ते रश्मी शुक्ला यांच्या नावाने पैसे मागायचे, असे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले आहे.
परंतु, रश्मी शुक्ला यांना देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ होते. संदीप जाधव यांनी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात खंडणीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर केवळ धनंजय धुमाळला निलंबित करण्यात आल्याचे दाखवण्यात आले. पण प्रत्यक्षात त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण रफादफा केले. आता मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.
News English Summary: Banjara community leader Haribhau Rathore has leveled serious allegations against IPS officer Rashmi Shukla, who is under discussion over the phone tapping case. He has said that he wanted to collect ransom when Rashmi Shukla was the Pune Police Commissioner.
News English Title: Haribhau Rathod made serious allegations on Rashmi Shukla news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा