14 December 2024 7:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Saki Naka Rape Case | अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, पीडितेच्या कुटुंबियांना 20 लाखाची मदत | वकील राजा ठाकरे यांची नेमणूक

Sakinaka Rape

मुंबई, १३ सप्टेंबर | गणेशोत्सवाच्या वातावरणात मुंबईला सुन्न करणारी घटना गेल्या आठवड्यात साकीनाका परिसरात घडली. एका ३४ वर्षीय महिलेवर टेम्पोचालकाने अमानुष लैंगिक अत्याचार केले. या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अंधेरी साकीनाका परिसरात राहणारा आरोपी मोहन चौहान याने पीडितेवर केलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील तपासाबाबत माहिती दिली आहे.

Saki Naka Rape Case, अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, पीडितेच्या कुटुंबियांना 20 लाखाची मदत, वकील राजा ठाकरे यांची नेमणूक – Mumbai police commissioner Hemant Nagrale press conference over Saki Naka rape case updates :

पीडित महिला ही विशिष्ट समाजाची असल्याने अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे आणि त्याने गुन्हाच्या संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. घटनास्थळावर गुन्हा कसा घडला या घटनाक्रमातून सर्व पुरावे मिळाले आहेत. आरोपीकडून गुन्हासाठी वापरण्यात आलेलं हत्यार सुद्धा जप्त करण्यात आलं आहे,” असे हेमंत नगराळे यांनी सांगितलं.

घटनास्थळावर पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला, त्यानंतर आरोपी कसा पळून गेला, या सगळ्याची पुराव्यासकट माहिती मिळाली आहे. आरोपीकडे असणारं प्रमुख हत्यारंही आपण जप्त केलं आहे. या संवेदनशील गुन्ह्यासाठी स्पेशल वकील राजा ठाकरे यांची नेमणूक केली आहे. ते आपल्याला तपासात मार्गदर्शन करत आहेत”, असं नगराळे यांनी सांगितलं.

पीडितेच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत:
नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्टचे वॉईस चेअरमन यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. आज दीड वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, स्थानिक आमदार, मुख्य सचिव, अपर उपसचिव आणि इतर अधिकारी या सगळ्यांची सह्याद्री अतिथिगृहावर या विषावर चर्चा झाली. पोलिसांच्या तपासावर कौतुक करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय मदत योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांमधून आणि मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या मुलींना 20 लाखांची दिली जाणार आहे. पीडितेला तीन मुली आहेत. त्याचबरोबर इतर शासकीय योजनांतून जेवढी मदत देता येईल तेवढी मदत केली जाईल”, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai police commissioner Hemant Nagrale press conference over Saki Naka rape case updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x