3 May 2025 3:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

मला जेलरने सकाळी मारलं | माईक फक्त रिपब्लिकचे | अर्णब संबंधित तथ्यहीन वृत्त पेरणी

Republic TV, editor Arnab Goswami, shifted to Taloja Jail

मुंबई, ८ नोव्हेंबर: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत प्रत्येक दिवशी वाढ होताना दिसत आहे. कालच अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याने त्याची चिंता अजून वाढली आहे.

त्यानुसार अर्णब गोस्वामी यांची अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून आता तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी रायगड आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त टीमने त्यांच्या राहत्या घरातून सकाळी अटक केली होती. तिथून त्यांना थेट अलिबाग येथे नेण्यात आले होते.

दरम्यान, अर्नबला तळोजा कारागृहात घेऊन जातं असताना तेथे केवळ रिपब्लिकचे दोन प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांना दोन रिपोर्टरकडे अर्नबने माझ्या जीवाला धोका असून सर्वोच्च न्यायालयाने आणि केंद्र सरकारने लक्ष घालावं. तसेच मला माझ्या वकीलांशी बोलू दिलं जातं नाही असा कांगावा त्याने स्वतःच्याच रिपोर्टरकडे केला. त्यानंतर याच बाईटचा आधार घेत रिपब्लिकन समाज माध्यमांवर तथ्यहीन ट्रेंड आणि कांगावा सुरु केल्याचं दिसतं आहे. विशेष म्हणजे रिपब्लिकच्या एका एका ट्विट मध्ये तर अर्नबला सकाळी जेलरने मारहाण केल्याचं म्हटलं आहे. मात्र दुसरी विचारात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर त्याला घेऊन जाण्यापूर्वी तो स्वतः सांगतो आहे की मला माझ्या वकीलांशी बोलू दिलं जातं नाही, मग त्यानंतर जेलमध्ये गेलेल्या अर्नबच्या संबधित बातम्या रिपब्लिकच्या न्युज रूममध्ये कुठून धडकत आहे ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

आसाममध्ये अर्नबच्या नात्यातील लोकं सत्तेत असल्याने तिकडे इव्हेंट असल्याप्रमाणे कॅम्पेन टीशर्ट घालून तरुण तरुणी प्रतिक्रिया देत आहेत ज्यांना नेमकं कशासाठी अटक झाली आहे त्याचा पत्ताच नाही. मात्र तेच व्हिडिओ समर्थनाचे असल्याचं रिपब्लिक त्यांच्या वाहिनीवरून सांगत आहे हे विशेष. मात्र आता रिपब्लिक यामध्ये प्रेस नोट काढून समाज माध्यमांवर जीवाला धोका असल्याचा कांगावा करत आहे.

 

News English Summary: Republic TV editor Arnab Goswami, who is in judicial custody in the Naik suicide case, is facing increasing difficulties. While the hearing on Arnab Goswami’s bail application was adjourned yesterday, his concern has been heightened by the police administration’s decision to send him to the Taloja jail.

News English Title: Republic TV editor Arnab Goswami shifted to Taloja Jail News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या