23 March 2023 4:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा SBI Share Price | सरकारी एसबीआय बँकेचा शेअर तेजीत येतोय, शेअरची वाटचाल आणि टार्गेट प्राईस पाहून घ्या Bombay Super Hybrid Seeds Share Price | या शेअरने 6 महिन्यात 278 टक्के परतावा दिला, आता स्टॉक रोज अप्पर सर्किटवर, पैसे लावणार?
x

BREAKING | राज्यात रुग्णांना गरज, तरी महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन गुजरातला पळवला जातोय

Maharashtra corona pandemic

नागपूर, ०७ मे | महाराष्ट्रात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या रूग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारकडून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र यामध्ये ऑक्सिजन पुरवठा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यास केंद्र सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधक करत आहेत. एकीकडे महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून येत असलेला ऑक्सिजन साठा कर्नाटक सरकारने रोखल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र आता अजून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे राज्याने विविध ठिकाणांहून ऑक्सिजन मागवण्यास सुरूवात केली. मात्र, असे असताना महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन गुजरातला पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

भिलाई येथून महाराष्ट्रातील नागपूरला वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन चार टँकर्स येत होते. मात्र, हे टँकर्स गुपचूप गुजरातच्या दिशेने नेत असल्याचा प्रकार समोर आला. ५ मे रोजी दोन ऑक्सिजन टँकर्स गोंदिय जिल्ह्यातील देवरी बॉर्डरवर पकडण्यात आले, तर ६ मेला दोन टँकर्स औरंगाबाद आणि जालना या दरम्यान पकडण्यात आले आहेत. हे चारही ऑक्सिजनचे टँकर्स हे नागपूर प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत.

महाराष्ट्रासोबतच गुजरातमध्ये सुद्धा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यामुळे तेथेही वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, असे असले तरी महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन तिथेकुणाच्या सांगण्यावरुन नेण्यात येत होता असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

News English Summary: The state is facing a shortage of medical oxygen along with a growing number of corona patients. As a result, the state started ordering oxygen from various places. However, the shocking manner in which Maharashtra’s share of oxygen has been diverted to Gujarat has created a stir.

News English Title: Shocking manner in which Maharashtra share of oxygen has been diverted to Gujarat news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x