13 May 2021 8:13 AM
अँप डाउनलोड

उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं | शेतात बेशुद्ध अवस्थेत ३ मुली आढळल्या | दोघींचा मृत्यू

Two Dalit girls, Unnao, Uttar Pradesh

उन्नाव, १८ फेब्रुवारी: उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे दलित मुलींच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. बुधवारी चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तिन्ही मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडल्या होत्या. यामधील दोघींचा मृत्यू झालेला असून एका मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलींवर विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मिळालेल्या वृत्तानुसार, जंगलामध्ये संशयास्पद अवस्थेत तीन मुली आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच मुलींना लगेचच जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र दोन मुलींना मृत घोषित करण्यात आलं. तर तिसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कानपूरच्या एका रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तिन्ही मुली या आपल्या शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच डीएम आणि अन्य अधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे.

गाव आणि रुग्णालय परिसराच्या आसपास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी असोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मुली शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या आहेत. सध्या या प्रकरणात अनेकांची अधिक चौकशी केली जात असून वेगाने तपास करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून खळबळ निर्माण झाली आहे. तर मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी या तिघी जणी चारा आणण्यासाठी शेतात गेल्या असल्याचं म्हटलं आहे.

 

News English Summary: The death of a Dalit girl in Unnao in Uttar Pradesh has caused a stir. The three girls, who had gone out to collect fodder on Wednesday, were found unconscious in a field. Two of them have died and a girl is undergoing treatment at a hospital. The family members have alleged that the girls were poisoned.

News English Title: Two Dalit girls found dead in Unnao Uttar Pradesh news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(158)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x