प. बंगाल | मणी लॉन्ड्रींग प्रकरणातील १३ पैकी ७ जण भाजपात | घोटाळ्याचे व्हिडिओ गायब

नवी दिल्ली, २१ डिसेंबर: पुढील वर्षी म्हणजे एप्रिल-मे 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याआधीच आतापासूनच फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमधील एकूण 294 पैकी तब्बल 200 जागा जिंकण्याचा निर्धार अमित शाहांनी केला आहे. एकीकडे बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर, त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने शेजारील पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली. बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस 219 जागांसह सत्तेत आहे. बंगालमध्ये बहुमताचा आकडा 148 इतका आहे. 2021 मध्ये इथे निवडणुका होत आहेत.
टीएमसी आणि काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सुवेंदु अधिकारी यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मी त्यांचं स्वागत करतो. अन्यायाच्या विरोधात ज्यांना आवाज उठवायचा आहे त्यांनी भारतीय जनता पक्षात यावं. काल आमचे सर्व पोस्टर्स फाडण्यात आले. मात्र आज मोठ्या प्रमाणात लोकं जमली. मी लोकांचा आभारी आहे,” असं अमित शाह कालच्या सभेत म्हणाले.
वास्तविक भारतीय जनता पक्षाने तृणमूलच्या अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस धाडल्या होत्या आणि त्यांना चौकशी फेऱ्यात ओढलं होतं. पश्चिम बंगालमधील चर्चित नारदा घोटाळ्यातील एक आरोपी आणि तत्कालीन तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी हे नुकतेच भारतीय जनता आपेक्षित दाखल झालेत. केन्द्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या यूट्यूब चॅनलवरून सुवेंदू अधिकारी यांचा नारदा घोटाळ्यासंबंधित व्हिडिओ अचानक ‘गायब’ झाला आहे. Suvendu Adhikari’s video related to the Narada scam has suddenly ‘disappeared’ from the BJP’s YouTube channel.
So @BJP allegedly removes Narada sting video from its YouTube channel
Amit Shah’s magical laundry drive continues through WB- join the BJP- emerge freshly washed & spanking clean! pic.twitter.com/iAV4Dgq3C0
— Mahua Moitra (@MahuaMoitra) December 21, 2020
भारतीय जनता पक्षाकडून नारदा घोटाळ्यात ज्यांच्यावर आरोप आला ते सुवेंदू अधिकारी, मुकूल रॉय तसंच शोभन चटर्जी हे आता भारतीय जनता पक्षाच्या गोटात दाखल झालेले आहेत. तृणमूल काँग्रेस नेते सुवेंदू अधिकारी यांचा नारदा घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप करणारा एक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला होता. या स्टिंगची टेप अनेक न्यूज चॅनेल्सना पाठवण्यात आली होती. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे काही नेते लाच घेताना या टेपमध्ये दिसत होते. हा व्हिडिओ भाजपच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून शेअर देखील करण्यात आला होता. (Suvendu Adhikari, Mukul Roy and Shobhan Chatterjee, who were accused by the BJP in the Narda scam, have now joined the BJP).
मागील महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाकडून तृणमूलच्या तीन नेत्यांना नोटीस पाठवत कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. सीबीआय आणि ईडीकडून या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. सीबीआयकडून या कथित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये मदन मित्रा, मुकूल रॉय (हेही आता भारतीय जनता पक्षात दाखल झालेले आहेत), सौगता रॉय, सुलतान अहमद (२०१७ मध्ये निधन), इकबाल अहमद, काकोली घोष, प्रसून बंदोपाध्याय, सुवेंदू अधिकारी, शोभन चटर्जी (आता भारतीय जनता पक्षामध्ये) सुब्रत मुखर्जी, फरहाद हाकीम, अपरूपा पोड्डार आणि आईपीएस अधिकारी सय्यद हुसैन मिर्झा यांच्या नावाचा समावेश होता.
News English Summary: The Bharatiya Janata Party (BJP) had issued ED notices to several Trinamool leaders and dragged them into interrogation. Suvendu Adhikari, one of the accused in the notorious Narda scam in West Bengal and a leader of the then Trinamool Congress, has recently entered the Indian public. Suvendu Adhikari joined the Bharatiya Janata Party on Saturday in the presence of Union Home Minister Amit Shah. After that, Suvendu Adhikari’s video related to the Narada scam has suddenly ‘disappeared’ from the BJP’s YouTube channel.
News English Title: West Bengal Narada scam Suvendu Adhikaris video disappears from BJP YouTube channel news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC