20 June 2021 9:22 PM
अँप डाउनलोड

Amul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा

Amul franchise offer, your own business, Earn in lakhs

मुंबई, ०१ जानेवारी : नव्या वर्षी बक्कळ कमाई करायचा विचार असेल तर अमूल तुमच्यासाठी नवी संधी घेऊन आलं आहे. नवीन वर्षामध्ये अमूल फ्रॅन्चायजी ऑफर करत आहे. अमूल कोणतीही रॉयल्टी आणि प्रॉफिट शेयरिंगशिवाय ही फ्रॅन्चायजी देणार आहे. एवढच नाही तर अमूलची फ्रॅन्चायजी घ्यायचा खर्चही जास्त नाही. २ लाख रुपये ते ६ लाख रुपये गुंतवून तुम्ही व्यवहार सुरु करु शकता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अमूलने दोन प्रकारच्या फ्रॅन्चायजी ऑफर केल्या आहेत. जर तुम्हाला अमूल आऊटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल क्योस्क फ्रॅन्चायजी घ्यायची असेल तर २ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. यामध्ये नॉन रिफंडेबल ब्रॅण्ड सिक्युरिटीचे २५ हजार रुपये, दुकानाच्या नुतनीकरणाचे १ लाख रुपये, अमूलच्या उपकरणांचे ७५ हजार रुपये यांचा समावेश आहे. यामध्ये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून 25 हजार रुपये (म्हणजे परत न मिळण्याच्या अटीवर), तर रिनोवेशन अर्थात नुतनीकरणासाठी 1 लाख रुपये आणि साधनसामुग्रीसाठी 75 हजार रुपयांचा खर्च येईल. याबाबतची अधिक माहिती तुम्हाला फ्रँचायझी पेजवर मिळू शकेल.

अमूलचं आईस्क्रीम पार्लर सुरु करण्यासाठी तुम्हाला जवळपास ५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये ब्रॅण्ड सिक्युरिटीचे ५० हजार रुपये, दुकानाच्या नुतनीकरणासाठी ४ लाख रुपये, अमूलच्या उपकरणांसाठी १.५० लाख रुपये मोजावे लागतील.

कमाई किती होते?
अमूलच्या मते, फ्रँचायजीद्वारे दर महिन्याला 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. मात्र कोणत्याही व्यवसायासाठी जागा/ ठिकाण महत्त्वाचं असतं. अमूलचं आऊटलेट सुरु केल्यानंतर, कंपनी अमूलच्या उत्पादनावर किमान विक्री किंमत अर्थात MRP वर कमिशन देते. यामध्ये एका दुधाच्या पिशवीवर 2.5 टक्के, दूध उत्पादनावर 10 टक्के आणि आयस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळतं.

आयस्क्रीम स्कूपिंग पार्लरच्या फ्रँचायझीवरही मोठं कमिशन दिलं जातं. आयस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन दिलं जातं. प्री पॅक्ड आयस्क्रिमवर 20 टक्के, अमूल प्रोडक्टवर 10 टक्के असं कमिशनचं गणित आहे.

जर तुम्हाला अमूल आऊटलेट फँचायझी घ्यायची असेल तर तुमच्याकडे किमान 150 स्क्वेअर फूट जागा हवी. जर इतकी जागा असेल तर तुम्हाला फ्रँचायझी मिळू शकते. आयस्क्रीम पार्लरच्या फ्रँचायझीसाठी ही अट 300 स्क्वेअरफूट जागेची आहे. यापेक्षा कमी जागा असेल तर तुम्हाला फ्रँचायझी मिळू शकणार नाही.

अमूलकडून तुम्हाला कंपनीची ओळख दिली जाईल. सर्व साहित्य आणि ब्रँडिगवर सबसिडी मिळेल. त्याशिवाय सुरुवात करण्यासाठी विशेष मदत केली जाईल. जास्त माल खरेदी केल्यावर डिस्काऊंट मिळेल. ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर दिल्या जातील. याशिवाय मालक किंवा कर्मचाऱ्याला ट्रेनिंग दिलं जाईल. तुमच्यापर्यंत उत्पादनं पोहोचवण्याची जबाबदारी अमूलची असेल. अमूलकडून प्रत्येक मोठी शहरं, जिल्ह्याच्या ठिकाणांवर होलसेल डीलर्स नियुक्त केले आहेत. हे डीलर्स तुमच्यापर्यंत उत्पादनं पोहोचवतील.

अधिक माहितीसाठी येथे भेट द्या – Click Here

अमूलची फ्रँचायझी संबंधित ई-मेल [email protected]

 

News English Summary: If you want to earn a lot in the new year, Amul has brought you a new opportunity. Amul is offering a franchise in the new year. Amul will offer the franchise without any royalty and profit sharing. Not only that, but the cost of acquiring the Amul franchise is also not high. You can start a transaction by investing Rs 2 lakh to Rs 6 lakh.

News English Title: Amul franchise offer start your own business to earn lakhs rupees news updates.

हॅशटॅग्स

#Business(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x