23 September 2021 1:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

मुंबई पोलिसांची एक टीम राज कुंद्रा यांना घेऊन शिल्पा शेट्टीच्या घरी | पुराव्यांचा शोध घरापर्यंत

Raj Kundra

मुंबई, २३ जुलै | पोर्नोग्राफी प्रकरणात शुक्रवारी शिल्पा शेट्टीच्या घरी मुंबई पोलिसांची एक टीम राज कुंद्रा यांना घेऊन दाखल झाली आहे. पोलिसांची टीम चौकशी व राज कुंद्राविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी शिल्पाच्या घरी दाखल झाली आहे. दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अश्लील फिल्म प्रकरणात पती राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर सध्याचा काळ आव्हानांचा सामना करण्याचा असल्याचे म्हटले आहे. शिल्पा म्हणाली की, जीवनात अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना केला असून या प्रकरणाचाही ती धैर्याने सामना करेल.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पोर्नोग्राफी तयार करून ते काही अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा (45) यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली होती. मंगळवारी कुंद्रा यांना न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांना 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आत याची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन महिलांनी तक्रार केली आहे, की त्यांना राज कुंद्रा यांनी अश्लील चित्रपटात काम करण्यासाठी मजबूर केले. आरोपींनी संघर्ष करत असलेल्या मॉडल, अभिनेत्यांसह अन्य लोकांच्या मजबुरीचा फायदा उठवून त्यांना असे घाणेरडे काम करण्यासाठी बाध्य केले.

दरम्यान, शिल्पाने गुरुवारी रात्री सोशल मीडिया अॅप इंस्टाग्रामवर अमेरिकी लेखक जेम्स थर्बर यांच्या पुस्तकातील एक उद्धरण शेअर केले आहे. त्यामध्ये लिहिले आहे, की ‘ क्रोधामध्ये मागे वळून पाहू नये आणि भयभीत होऊन पुढेही जाऊ नये. सावध होऊन जरूर मार्गक्रमण करावे’

शिल्पाने इंस्टाग्रामवर लिहिले आहे, की ‘ मी एक दीर्घ श्वास घेते. मला माहिती आहे, की मी भाग्यशाली आहे, कारण मी जिवंत आहे. यापूर्वीही मी अनेक आव्हानांचा सामना केला आहे आणि भविष्यातही आव्हानांना सामोरे जाईन. मला माझे आयुष्य जगण्यापासून कोणतीही गोष्ट भ्रमित करू शकत नाही

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai Police team reached to Shilpa Shetty’s home with Raj Kundra for investigation news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(266)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x