27 July 2024 11:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने म्हणणाऱ्या शिंदे गटाच्या 40 आमदारांकडून मूदतवाढीचा हट्ट, यातच सुप्रीम निकालाचं सत्य उघड होतंय?

Shinde Camp 16 MLA

Shinde Camp | गेल्यावर्षी शिवसेनेत मोठं बंड झालं होतं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार बाहेर पडले आणि सुरतमार्गे गुवाहाटीला पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांनी भाजपासोबत आघाडी करुन नवीन सरकार स्थापन केलं. त्यावेळी शिवसेना आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याची सातत्याने मागणी केली जात आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील शिवसेनेच्या 40 आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 15 आमदारांना नोटीस बजावली होती. आपलं म्हणणं मांडण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली.

वेळ पुढे ढकलण्याचे राजकीय बहाणे?
यापूर्वी जेव्हा सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केला होता तेव्हा निकाल आमच्या बाजूने लागल्याचा कांगावा शिंदे गटाने केला होता, पण कायदेतज्ञांच्या मते निकाल हा ठाकरेंच्या बाजूने म्हंटले होते. दरम्यान विधानसभेच्या अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटीसला ज्या आमदारांनी उत्तर दिलं आहे, त्यांच्या उत्तराचा आढावा घेण्यासाठी विधीमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये या सर्व प्रकरणावर चर्चा झाली. मात्र अद्यापही 14 आमदारांच्या उत्तराचा आढावा घेणं बाकी आहे. त्यातच पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील हे प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली होती. या नोटीसीला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र आता शिवसेनेच्या 40 आमदारांकडून मूदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे, त्यामुळे हे प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

News Title : Shinde Camp 16 MLA Disqualification case Rahul Narvekar Maharashtra legislative assembly speaker 25 July 2023.

हॅशटॅग्स

#Shinde Camp 16 MLA(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x