11 April 2021 5:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आरोग्यमंत्र्यांनी दिली लॉकडाऊनबाबत प्राथमिक माहिती | अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे आंबे खाल्ल्यावर मुलं होतात असे बोलणाऱ्यांनी संकटाच्या काळात समाजाची दिशाभूल करु नये कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक - योगी आदित्यनाथ देशात रेमडेसिविर इंजेक्शनसाठी लोकांची वणवण | पण गुजरातमध्ये भाजप कार्यालयात स्टॉक परमबीर सिंह अडचणीत | राज्य सरकारने माजी पोलिस आयुक्तांचा तपास IPS संजय पांडेंकडे सोपवला उद्या मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यास त्यालाही फडणवीस विरोध करणार का? पंढरपूर पोटनिवडणूक | राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा | भाजपविरोधात प्रचारही करणार
x

AXIS बँकेचा ग्राहकांना झटका | आता SMS सह अनेक सेवांसाठी भरमसाठ शुल्क वाढ

Axis Bank, private sector bank, Revised SMS charges

मुंबई, ०२ एप्रिल: खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने SMS शुल्कामध्ये बदल केलाय. दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे नवीन यंत्रणा लागू झाल्यानंतर अ‍ॅक्सिस बँकेने या शुल्कात बदल केलाय. अन्य प्रकारच्या शुल्काबद्दल बोलताना या बँकेने रोख पैसे काढण्याची फी वाढविलीय. तसेच खात्यातील किमान सरासरी शिल्लक रक्कमही वाढवलीय. अ‍ॅक्सिस बँकेने अटेस्टेशन फीस कमी केलीय.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जुलै २०२१ पासून ग्राहकांकडून प्रत्येक SMS’साठी २५ पैसे शुल्क आकारलं जाईल. तसंच कोणत्याही महिन्यात हे शुल्क २५ रूपयांपेक्षा जास्त असणार नाही. खासगी क्षेत्रातील सर्वाधिक मोबाईल बँकिंग ट्रान्झॅक्शन्स हे याच बँकेतून होतात. यामध्ये प्रमोशनल मेसेज किंवा ग्राहकांना मिळणाऱ्या ओटीपीवर शुल्क आकारलं जाणार नाही. प्रिमिअम खाती, पगाराची खाती आणि अन्य खात्यांसाठी हे शुल्क निरनिराळं असेल.

सध्या AXIS Bank एसएमएससाठी दरमहा ५ रूपये शुल्क आकारलं जातं. दर तीन महिन्यांनी ग्राहकांच्या बँक खात्यातून १५ रुपये वजा केले जातात. ३० जूनपर्यंत बँक ग्राहकांकडून १५ रूपयेच घेणार आहे. परंतु १ जुलै पासून प्रति एसएमएस २५ पैसे शुल्क आकारलं जाईल. पण कोणत्याही एका महिन्यात २५ रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारले जाणार नाही. तर बँकेतून रोख रक्कम काढल्यास बँक प्रति विड्रॉल ५ रूपये शुल्क आकारते. मात्र आता १ मे पासून बँक ग्राहकांकडून १००० रूपयांच्या विड्रॉलवर १० रूपये शुल्क आकारेल.

टेलिकॉम अ‍ॅथॉरिटीच्या नव्या नियमानुसार, ज्यांना ग्रुपवर मेसेज पाठवायचे आहेत, त्यांनी आधी प्री-रजिस्टर्ड टेम्पलेट सबमिट करणे आवश्यक आहे. यानंतर सर्व संदेशासाठी हे टेम्पलेट वापरावे लागेल. तसे न केल्यास संदेश दूरसंचार ऑपरेटरकडून अवरोधित केला जाईल. अशा संदेशास प्रमाणीकरण ऑथेन्टिकेटिंग प्रोसेसची स्क्रबिंग म्हणतात. टेलिकॉमच्या सूत्रांच्या हवाल्याने एका मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, स्क्रबिंगमुळे हे शुल्क बँकेकडून वसूल केले जात आहे.

रोकड पैसे काढण्याचे शुल्क
प्रति 100 रुपयांवर 5 रुपये कापले जातात. परंतु 1 मेपासून आता ग्राहकांना 1000 रुपयांच्या रोख रक्कम काढण्यासाठी 10 रुपये द्यावे लागतील.

 

News English Summary: Axis Bank, the largest private sector bank, has revised its SMS charges. Axis Bank has revised the tariff following the introduction of a new mechanism by the Telecom Regulatory Authority. Speaking of other types of charges, the bank has increased the cash withdrawal fee. Also, the minimum average balance in the account has been increased. Axis Bank has reduced attestation fees.

News English Title: Axis Bank the largest private sector bank has revised its SMS charges news updates.

हॅशटॅग्स

#AXISBank(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x