21 November 2019 7:17 AM
अँप डाउनलोड

मागील ५ वर्षांपासून एनपीए समस्येमुळे बँकिंग क्षेत्रावरील संकट चिंताजनक: अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी

Nobel Award Winner abhijeet banerjee, Economist abhijeet banerjee, Indian Banking Sector, Banking Sector NPA

नवी दिल्ली : देशातील बँकिंग क्षेत्रावरील संकट चिंताजनक आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी धडाडीने निर्णय घ्यायला हवेत, असे मत नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी मंगळवारी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या जवळपास पाच वर्षांपासून बँकिंग व्यवस्था ही उच्च अनुत्पादित मालमत्तेच्या (एनपीए) समस्येने ग्रासली आहे. त्यातून अनेक बँकांच्या नक्त मालमत्तेचा ऱ्हास आणि नवनव्या प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता उजेडात येऊ लागल्या आहेत. पंजाब- महाराष्ट्र सहकारी बँकेतील (पीएमसी) घोटाळा ही त्यातील नवी भर आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले.

‘पंतप्रधान मोदी यांनी मला मीडियापासून सावध राहण्यास सांगितलंय. मीडिया तुम्हाला माझ्या विरोधात बोलायला भाग पाडेल,’ असं त्यांनी हसत-हसत सांगितल्याची माहिती नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी आज दिली.

अर्थशास्त्रातील २०१९ च्या नोबेलचे मानकरी ठरलेले भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. बॅनर्जी यांच्या कार्याचा देशाला अभिमान आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,’ असं ट्विट मोदींनी या भेटीनंतर केलं होतं. बॅनर्जी यांनीही या भेटीविषयी पत्रकारांशी संवाद साधला.

काँग्रेसला २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘न्याय योजना’ हा वचननामा तयार करण्यासाठी अभिजीत बनर्जी यांनी मदत केली होती. म्हणून जागतिक गरिबी या विषयावर संशोधन केल्यामुळे बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सध्या देशाची अर्थव्यवस्था डळमळीत असल्याचे म्हटल्यामुळे अभिजीत बॅनर्जी यांच्या भाजपाच्या नेत्यांनी टीका केली होती. ‘बॅनर्जी यांचे विधान चुकीचे आहे. ते डाव्या विचारसरणीचे आहे. त्यांनी काँग्रेसच्या न्याय योजनेचे कौतुक केले होते. पण हिच योजना अपयश ठरली आहे’, असं म्हणतं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बॅनर्जी यांच्या टीका केली होती.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1044)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या