21 November 2019 7:17 AM
अँप डाउनलोड

कोल्हापूर जिल्ह्यातुन ६९ जिवंत गावठी बॉम्ब जप्त

Bomb, Kolhapur, 69 Bomb

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगी येथे ६९ गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याबाबत दोघांना अटक करण्यात आली आहे. विलास जाधव आणि आनंदा जाधव अशी अटक केलेल्यांची नाव असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मिळलेली माहिती अशी की, आरोपी विलास जाधव आणि आनंदा जाधव या दोघा संशयितयांच्या घरातून ६९ गावठी बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य,असा सात हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये उजळाईवाडीमध्ये झालेल्या स्फोटाचे धागेदोरे आहेत का, याचाही तपास पोलिस करत आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली बॉम्ब स्फोट झाला होता. त्यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. तसंच विधानसभेच्या मतदानादिवशी कोल्हापुरात बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी याबाबतची चौकशी सुरु केली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांना शिकारीसाठी बॉम्ब वापरत असल्याची माहिती मिळाली.

हॅशटॅग्स

#Maharashtra(38)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या