9 July 2020 11:45 AM
अँप डाउनलोड

वसई, नालासोपारा, बोईसरच्या जागांवर फक्त ईव्हीएम घोटाळा आम्हाला हरवू शकतो: हितेंद्र ठाकूर

MLA Hitendra Thakur, MLA Kshitij Thakur, Nalasopara, Vasai, Boisar, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा आणि वसई-विरार मतदारसंघाचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भविष्यात आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले. मात्र, आपण राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. संघटनात्मक पातळीवरील राजकारणात सक्रिय राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या राजकारणाने पातळी सोडली. दोन गोळ्या घालण्याची भाषा झाली. ही घटनाच दुर्दैवी आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवणारी आहे, अशा शब्दात हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारपरिषदेत खेद व्यक्त केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तसेच मतदारांना भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल भावनिक किंवा मतदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी मी मतदानाच्या अगोदर हा निर्णय घेऊ शकलो असतो. पण मला लोकांना भावनिक करायचे नव्हते, तर मेरिटवर निवडणुकीत विजय मिळवायचा होता. म्हणून मी दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडे मुद्दे नसतील तर दहशतीचे आरोप करतात, वसई-विरारमध्ये सर्व लोकं एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहतात. त्यात असे कोणीही उपरे येतात आणि दहशतीचा आरोप करतात. अतिशय गंभीर आरोप केले गेले. जाणीवपूर्वक मी निवडणुकीच्या मतदानानंतर मी पुढे निवडणूक लढणार नाही हे जाहीर केलं. कारण परत कोणी भावूक वैगेरे आरोप केले असते. मी राजकारणात राहणार, कार्यकर्त्यांना पुढे आणणार, कामं करुन बाहेरुन कोण आलेले आरोप करतात असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच प्रदीप शर्मा यांनी पैसे वाटले, पोलीस यंत्रणा हाती घेतली. गुंड कार्यकर्ते आणले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या गाडीला घेराव घातला. काही अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन त्यांना सोडलं. मी याबाबत लेखी तक्रार दिली आहे. आयजी यांनी विशेष लक्ष दिल्याने प्रदीप शर्माच्या गुंडांना हुल्लडबाजी करता आली नाही. आम्ही विकासावर बोलतोय तुम्ही विकासावर बोला. पुढील ५ वर्षात जे उरलेली कामे आहे ती सर्व पूर्ण करणार आहे असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

वसई, नालासोपारा, बोईसर या तिन्ही सीट मोठ्या मताधिक्याने निवडून येणार. आमचा एकही उमेदवार पडला, तर ईव्हीएम घोटाळा असेल, असाही दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. वसई विधानसभा मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर पुन्हा विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे विजय पाटील निवडणूक लढवत आहेत. परंतु निकाल काहीही लागला, तरी ही निवडणूक अखेरची असल्याचं ठाकूर यांनी जाहीर केलं. या निवडणुकीत शिवसेना, भाजप, रिपाइं या सर्वांनीच मला मदत केली असल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. हितेंद्र ठाकूर यांचा ‘बविआ’ हा काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासह महाआघाडीमध्ये आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Hitendra Thakur(8)#Shivsena(889)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x