19 April 2024 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल
x

नवी मुंबईत कोरोनाचं प्रचंड थैमान, पुन्हा लॉकडाउनची घोषणा

Guardian Minister Eknath Shinde, Navi Mumbai, Lockdown

नवी मुंबई, २६ जून : नवी मुंबईत कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. त्यामुळे नवी मुंबईत २९ जूनपासून पुन्हा लॉकडाउन घोषित करण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे २९ जूनपासून ७ दिवसांसाठी हा लॉकडाउन असणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शहरातील ४४ कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाउन असणार आहे.

लॉकडाउनच्या नियमांत शिथिलता आणल्यानंतर नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. बाजारपेठ व मॉर्निग वॉकसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे झालेल्या या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागत असल्याचं बोललं जात आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कंटेनमेंट झोनची यादी आणि निर्बंध जाहीर केले आहेत. आदेशात सांगण्यात आल्यानुसार, कंटेनमेंट झोन असणाऱ्या सर्व ठिकाणी फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी परवानगी असणार आहे. कंटेनमेंट झोन असणाऱ्या या ठिकाणी तसंच त्याच्याबाहेर लोकांनी हालचाल तसंच प्रवास करु नये यासाठी कठोरपणे नियमाची अमलबजावी करावी असं सांगण्यात आलं आहे. मेडिकल एमर्जन्सी आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा यांना यामधून सूट असणार आहे.

मेडिकल एमर्जन्सी आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा यांना यामधून सूट असणार आहे. कंटनमेंट झोनमध्ये आरोग्याच्या दृष्टीने सर्व नियमांचं पालन केलं जाव असं आदेशात नमूद आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

 

News English Summary: Corona has made a huge splash in Navi Mumbai. Therefore, Guardian Minister Eknath Shinde has decided to declare a lockdown in Navi Mumbai from June 29. Therefore, this lockdown will be for 7 days from June 29.

News English Title: Guardian Minister Eknath Shinde has decided to declare a lockdown in Navi Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x