13 August 2020 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
हे काय? खासदार अदाणींच्या सौजन्याने वस्तू वाटप करतात | आमदारांचे अदाणी विरोधात मोर्चे राजदीप सरदेसाईंकडून प्रणव मुखर्जीच्या मृत्यूचं ट्विट | नंतर माफी | कुटुंबियांकडून खेद व्यक्त पार्थ पवार हे थोडे अपरिपक्व असल्याचं पवारांनी म्हटलं आहे | हिंदीत नया है वह - छगन भुजबळ डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू पार्थ पवारांच्या समर्थनार्थ | सध्या ते भाजपमध्ये आहेत पारदर्शक करप्रणाली सुरु | पण फेसलेस कर प्रणाली म्हणजे काय - सविस्तर राम जन्मभूमी ट्रस्टच्या प्रमुख महंतांना कोरोनाची लागण | मोदींसोबत मंचावर हजर होते ट्रम्प सरकारकडून H-1B व्हिसाधारकांना मोठा दिलासा | भारतीयांना सर्वाधिक फायदा
x

मनसे शेतकरी महामोर्चा! सरकारचा जीआर; शेतकऱ्यांनो शेतमाल आता थेट पालिका-नगरपालिका क्षेत्रात विका

Raj Thackeray, MNS, Avinash Jadhav

ठाणे : मागील महिन्यात ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत एका आंबे विक्रेत्या शेतकऱ्याचा स्टॉल स्थानिक भाजपने हटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या समर्थनार्थ ठाण्यातील मनसे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नैतृत्वाखाली आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आणि स्थानिक भाजप नगरसेवकांपासून सर्वानाच चोप देण्यात आला. मात्र त्यानंतर विषय एवढ्यावरच न थांबता मनसेने अजून एक लोकशाही मार्गाने पवित्रा घेत १७ मे रोजी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांना नगरपालिका तसेच पालिका हद्दीत थेट मालाची विक्री करता यावी यासाठी सरकारवर कायद्यात तरदूत करण्यासाठी दबाव आणण्याच्या उद्देशाने शेतकरी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

दरम्यान १७ मे रोजी मनसेने ठाण्यात शेतकरी हिताय महामोर्चा काढला, ज्याला आसपासच्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी, स्थानिक लोकांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणावर उपस्थिती दर्शवली होते. त्यानंतर सरकारवर दबाव अधिकच वाढला होता आणि त्यात ठाण्यातील राड्यात स्वतः भाजपचे स्थानिक प्रतिनिधी सामील झाल्याने भाजप सरकार शेतकरी विरोधात असल्याचा संदेश गेला होता.

अखेर मनसेच्या शेतकरी महामोर्च्यांच्या दबावामुळे राज्य सरकारला अधिकृतरित्या जीआर काढणं भाग पडलं असून, त्यातून थेट राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता राज्यातील शेतकरी नगरपालिका आणि पालिका हद्दीत थेट त्याच्या शेतमालाची विक्री करू शकतील असं जीआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र यासाठी मनसेच्या राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी असा संदेश देखील अविनाश जाधव यांनी दिला आहे. कारण योजना असून देखील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत आणि जर शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जाणार असतील तर त्यासाठी सदर विषय कार्यकर्त्यांनी राज्यभर पोहोचवावा असं म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये शेतकऱ्यांना थेट शेतमाल विकताना आता कुणीही त्रास देऊ शकणार नाही; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ह्यासाठी आग्रह धरला, आंदोलन पुकारले, मोर्चा काढला आणि अखेर हि शेतकरी हिताची ‘मनसे’ मागणी सरकारला मान्य करावीच लागली असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(633)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x