2 May 2024 7:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

सामान्यांचा खिसा खाली होणार! अनुदानित व विनाअनुदानित सिलिंडर महागले

Narendra Modi

नवी दिल्ली : सामान्य जनतेसाठी अत्यंत त्रासदायक बातमी म्हणजे जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी स्वयंपकाच्या गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर तर तब्बल २५ रूपयांनी महागलं आहे तर अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत १ रूपया २३ पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत १ जून म्हणजेच आजपासून अनुदानित सिलिंडरचा एकूण दर ४९७ रुपये ३७ पैसे इतका झाला आहे. तर मुंबईतल्या अनुदानित सिलिंडरची किंमत ४९५ रुपये ९ पैसे इतकी झाली आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी ही अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल महाग झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रूपया कमकुवत झाल्याने सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. मुंबईत विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ७०९ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे. IOC च्या वेबसाईटच्या महिनुसार दिल्लीत अनुदानित सिलिंडरची किंमत ४९७ तर मुंबईत ४९५ रुपये ९ पैसे तर कोलकात्यामध्ये हा दर ५०० रुपये ५२ पैसे इतका झाला आहे. तर चेन्नईत ४८५ रुपये २५ पैसे इतकी आहे.

१ एप्रिलला गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या होत्या. अनुदानित सिलिंडर मिळत असलेल्या कुटुंबाला वर्षाला १२ सिलिंडर मिळतात आणि सबसिडीचे पैसे बँक खात्यात जातात. आज झालेल्या दरवाढीमुळे सामान्यांचं बजेट कोलमडणार आहे यात शंका नाही. मात्र निवडणुकीच्या काळात याच किमती स्थिर राहतात आणि निवडणूक संपताच भाव वाढ कशी काय सुरु राहते असे अनेक प्रश्न सामान्य माणसाला सतावत आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x