15 May 2021 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली
x

मोदी सरकारची जबरदस्त कामगिरी | भारतापेक्षा पाकिस्तान-अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्थिर - राहुल गांधी

Pakistan, Afghanistan, Indian Economy, Rahul Gandhi

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर : भारतातील घसरती अर्थव्यवस्था आणि सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) झालेली मोठी घसरण या मुद्द्यांवरून आतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाच्या-IMF) अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालात या वित्तीय वर्षात भारताच्या जीडीपी विकासात १० टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या बरोबरच भारताचा विकासदर हा बांगलादेशच्या विकासदराहून कमी राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राहुल यांनी शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे म्हणत सरकारला टोला लगावला आहे. “भाजपा सरकारची आणखीन एक जबदस्त कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे करोना परिस्थिती हाताळली आहे,” असं राहुल यांनी ट्विट केलं आहे.

हे टीकास्त्र सोडत असताना राहुल गांधी यांनी IMF च्या आकडेवारीचा हवाला देत एक तक्ता देखील शेयर केला आहे. यात भारताचा जीडीपी १०.३० टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील वित्तीय वर्षात अफगाणिस्तानच्या जीडीपीत ५ टक्के, तर पाकिस्तानच्या जीडीपीत .४० टक्के इतकी घसरण पाहायला मिळेल असे या तक्त्यात दाखवण्यात आले आहे.

तत्पूर्वी प्रत्येक व्यक्तीच्या मागे जीडीपीच्या प्रमाणात भविष्यात बांग्लादेश लवकरच भारताला मागे टाकणार असल्याचे आयएमएफचा अंदाज आहे. यावरुनच राहुल गांधींनी बुधवारीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘ही द्वेषाने भरलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची कमाई आहे. बांग्लादेश भारताच्या पुढे जाणार आहे,’ असा टोला राहुल यांनी बुधवारी लगावला होता.

 

News English Summary: Congress leader Rahul Gandhi took a dig at the Centre on Friday over IMF’s projection that the Indian economy is set to contract by a massive 10.3% this year, saying it was another “solid achievement” by the government. Mr. Gandhi took a swipe at the government on Twitter by tagging a chart that showed IMF growth projections for 2020-21 for Bangladesh, Myanmar, Nepal, China, Bhutan, Pakistan, Sri Lanka, Afghanistan and India. The chart showed that the Indian economy is projected to contract by a massive 10.3% this year, the highest contraction among the countries mentioned.

News English Title: Even Pakistan And Afghanistan Handled Covid Better Than India Rahul Gandhi Slams Modi Government News updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x