26 January 2025 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता
x

भारतीय अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर घसरली.

Narendra Modi, PM Narendra Modi, Amit Shah, Indian Economy, World Bank

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे कि भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान पाच ट्रिलियन डॉलर इतके व्हावे. परंतु याच आठवड्यात जागतिक बँकेच्या २०१८ च्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या वरून सातव्या क्रमांकावर घसरली आहे. २०१७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान २. ट्रिलियन डॉलर होते. २०१८ मध्ये वाढ होऊन हा आकडा २.७३ इतका झाला.

पण क्रमवारीत मात्र भारताची घसरण झाली आहे. या घसरणीचे कारण म्हणजे २०१८ मध्ये फ्रान्स आणि ब्रिटनची अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत अधिक सक्षम स्थितीत राहिली. भारत ब्रिटन ला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर जाईल असे बोलले जात होते. परंतु ब्रिटन आणि फ्रान्सनेच भारताला सातव्या क्रमांकावर ढकलले आहे. भारतीय ऑटोमोबाईल उद्योग सध्या अडचणीच्या काळातून जात आहे. याचाच सगळ्यात मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला आहे. ऑटोमोबाईल उद्योगाच्या घसरणीकडे सगळ्यात काळजीची बाब म्हणून बघितले जात आहे.

यामुळेच वाहन निर्मिती करण्याऱ्या काहींनी तर उत्पादन बंद करण्याची घोषणा दिली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वाहनांच्या मागणीमध्ये होणारी घट. तसेच भारतातील बेरोजगारी व गरिबी हे देखील भारतातील अर्थव्यवस्थेवर परिमाण करणारे घटक आहेत. अर्थव्यवस्थेच्या आकारमानात झालेल्या वाढीचा अर्थ असा नाही कि लोकांचे जीवनमान सुद्धा त्याचप्रमाणे वाढत आहे. भारताचे आकारमान लक्षात घेता लोकसंख्येच्या आधारावर पहिले तर दरडोई उत्पनात आणि गरिबीतून बाहेर पडणाऱ्यांची संख्येत हळूहळू सुधारणा होत आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असली तरीही भारतापुढे गरिबीचे आव्हान अजूनही कायम आहे. आणि यात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x