28 September 2020 8:12 PM
अँप डाउनलोड

'मी कंगाल'! बँकेच्या ४,७६० कोटीच्या कर्जाप्रकरणी कोर्टाला माहिती दिली

Anil Ambani, Insolvent, Bankrupt, Chinese Bank

बीजिंग: रियालन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे एकेकाळी धनाढय़ उद्योगपती होते, परंतु, भारतातील दूरसंचार बाजारपेठेत अनर्थपूर्ण घडामोडी घडल्याने अंबानी आता धनाढय़ नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी शुक्रवारी ब्रिटनमधील न्यायालयात स्पष्ट केले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

चीनमधील बँकांच्या 68 कोटी डॉलर म्हणजे तब्बल ४,७६० कोटी रुपये कर्जाप्रकरणी लंडनमधील न्यायालयात सुनावणीदरम्यान अंबानी यांनी ही माहिती दिली. चीनमधील तीन बँकांनी अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनला ९२५.२० दशलक्ष डॉलर (६, ४७५ कोटी) एवढे कर्ज दिले होते. कर्ज घेताना अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिली होती. मात्र फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांची कंपनी कर्जभरणा करण्यात अपयशी ठरल्याने थकबाकीदार ठरली होती.

अनिल अंबानी यांच्याकडे ११ आलिशान मोटारी आहेत. तसेच एक विमान, एक यॉट आणि राहण्यासाठी इमारत आहे. इतकी मालमत्ता असतानादेखील अंबानी यांना दिवाळखोर कसे म्हणता येईल, असा प्रश्न न्यायाधीश डेव्हिड वोक्समन यांनी उपस्थित केला. अंबानी यांनी भारतात दिवाळखोरीचा अर्ज केला आहे का, असे त्यांनी विचारले. यावर अंबानी यांच्या वकिलांच्या समूहातील भारताचे मुख्य अधिवक्ता हरीश साळवे यांनी अंबानी यांनी दिवाळखोरीचा अर्ज केला नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

तत्पूर्वी एका दुसऱ्या प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्यूनिकेशन्सच्या २ अधिकाऱ्यांना दोषी ठरवले होते. याशिवाय अनिल अंबानी समुहातील ३ कंपन्यांना एक कोटी रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. दरम्यान, ४ आठवड्यांमध्ये हे पैसे बँकेत जमा करावे किंवा कंपनीच्या प्रमुखाला १ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले होते. रिलायन्स समुहातील ३ कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या डेडलाइनचे पालन केले नाही. तसेच न्यायालयाला चुकीची माहिती देखील दिली, असे कोर्टाने निकालात म्हटले होते. सुप्रीम कोर्टान अनिल अंबानी यांना एरिक्सन कंपनीचे थकवलेले ४५३ कोटी रुपये ४ आठवड्यात भरावे अन्यथा तुरुंगवासासाठी तयार रहावे, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. त्यानंतर हे कर्ज अनिल अंबानींचे बंधू मुकेश अंबानी यांनी फेडून भावाचा तुरुंगवास रोखला होता.

 

Web Title:  Industrialist Anil Ambani insolvent not able to repay loan taken from Chinese Bank.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#AnilAmbani(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x