नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या कंपन्यांचं होणाऱ्या तोट्यामुळे एकत्रीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या तंत्रन्यानाच्या युगात आता प्रत्येकजण मोबाईल वापरात आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या कमी होणाऱ्या वापरामुळे त्यांच्यावरील कर्जाचा आकडा वाढत चालेल आहे.व्यवसाय हिस्सा गमावून बसलेल्या या कंपन्यांना आर्थिक उभारी मिळावी यासाठी यासाठी एक्रातिकारणाचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे.

या दोन्ही कंपन्यांचे आर्थिक पुनरुज्जीवन व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यावर वेगवेगळे पर्याय चाचपून पहिले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून केंद्रीय मंत्रिमंडळात यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. बीएसएनएलच्या व्यवसायात सतत घाट होत असून या कंपनीच्या तोट्याचा एकदा १४ जाहीर कोटींवर पोहोचला आहे. तसेच या कंपनीमध्ये एकूण १,६५,१७९ कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या पगारासाठी उत्पन्नातील ७५ चक्के हिस्सा खर्च होतो. म्हणूनच या कंपन्यांनी एकत्र यावा असा सरकारला वाटत.

यासाठी या दोन्ही कंपन्यांना सरकारकडून ७४ हजार कोटी रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे. यात दोन्ही कंपन्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीसाठी तयार करण्यासह त्यांना बाहेर पडण्यासाठी देण्यात येणाऱ्या अतिरिक्त रकमेचाही समावेश असेल. या निर्णयावर आता दोन्ही कंपन्यांचे मत लक्षात घेऊन त्यावर अंमलबजावणी केली जाणारे आहे.

एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्या एकत्र होण्याची शक्यता.