मुंबई : दिवाळी जसजशी जवळ येऊ लागली आहे तस तशी महागाईसुद्धा सीमा ओलांडणार असं चित्र आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले असून इंधन दरांनी पुन्हा नौवदीच्या दिशेने कूच केली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २३ पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, आज मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर ८७ रूपये ७३ पैसे तर डिझेलची दर प्रति लिटर ७७ रुपये ६८ पैसे इतका झाला आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर २३ पैशांनी तर डिझेल प्रति लिटर २९ पैशांनी महागले आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर ८२.२६ तर डिझेल प्रति लिटर ७४.११ रूपये झाले आहे.

त्यामुळे सणासुदीचे दिवस जवळ येताच महागाई अजून वाढण्याची शक्यता या वाढणाऱ्या इंधन दरावरून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने जरी काही दिवसांपूर्वी थोडा दिलासा दिला होता, तरी तो केवळ तात्पुरता होता असं सामान्यांना वाटू लागलं आहे.

Now again hike in petrol and diesel price per litre