महत्वाच्या बातम्या
-
२०११ मधील जगात ३ऱ्या क्रमांकावरील भारतीय अर्थव्यवस्था थेट ७व्या स्थानावर घसरली: वर्ल्ड बँक रिपोर्ट
भारताकडून जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था होण्याचा मान काढून घेण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा दृष्टीनं भारताची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं वर्षं 2018मध्ये सुस्त राहिल्यानं त्याचा मोठा भुर्दंड देशाला बसला आहे. जागतिक बँकेच्या आकड्यांनुसार वर्ष 2018मध्ये ब्रिटन आणि फ्रान्सची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर आहे. त्यामुळेच या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेला पछाडत पुढे जाण्याचा मान मिळवला आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर सहाव्या क्रमांकावर फ्रान्स कब्जा मिळवला आहे. जिथे भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावरून घसरून सातव्या क्रमांकावर गेली असून, अमेरिका या यादीत नंबर वनवर कायम आहे.
6 वर्षांपूर्वी -
होंडाने मोटारसायकलींचे बनावट पार्टस बाजारातून जप्त केले
होंडा अँक्टिवा हि भारतातील सर्वात जास्त प्रमाणात विकली जाणारी मोटारसायकल आहे. दरमहा या मोटारसायकलीच्या २ लाख युनिट्सची विक्री होते. बाजारात या मोटारसायकलीचे बनावट पार्ट्स अगदी सहज आणि किमतीत मिळून जातात. या साठी कंपनीने बनवलेले अस्सल पार्टस कणी विकत घेतच नाही हे कंपनीच्या लक्षात आले. होंडाने बाजारात विकले जाणारे बनावट पार्टस जप्त करण्यास सुरुवात केली. आता हि मोहीम सफल होण्याच्या मार्गावर आहे. होंडाच्या बनावट पार्टसचे व्यवहार करणारे व्यापारी आणि उत्पादक यांच्याविरुद्ध होंडाने अंमलबाजवणीचे छापे टाकले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्या एकत्र होण्याची शक्यता.
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या कंपन्यांचं होणाऱ्या तोट्यामुळे एकत्रीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या तंत्रन्यानाच्या युगात आता प्रत्येकजण मोबाईल वापरात आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या कमी होणाऱ्या वापरामुळे त्यांच्यावरील कर्जाचा आकडा वाढत चालेल आहे.व्यवसाय हिस्सा गमावून बसलेल्या या कंपन्यांना आर्थिक उभारी मिळावी यासाठी यासाठी एक्रातिकारणाचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पत्रात ते म्हणाले! मी एक व्यावसायिक म्हणून अपयशी ठरलो आहे, मला माफ करा!
गेले दोन दिवस बेपत्ता असलेले ‘सीसीडी’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ यांनी मंगळुरु येथील नेत्रावती नदीत आत्महत्या केली असल्याचं सांगितलं आहे. आज नदीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. यावरून आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच सिद्धार्थ यांनी एक पत्र देखील लिहिले होते.
6 वर्षांपूर्वी -
अॅमेझॉन करणार आता फूड डिलीव्हरी!
मध्यंतरीच्या काळात भारतात विविध फूड डीलेव्हरी अँप्सने जोरदार प्रगती केली. स्विगी, झोमॅटो, सारख्या अँप्सने कित्येकांची मने जिंकली. ह्या फूड डीलेव्हरी अँप्सच्या स्पर्धेत आता अजून एक स्पर्धक येतो आहे तो म्हणजे अॅमेझॉन. अॅमेझॉनने त्यांच्या ह्या नवीन उद्योगाची सुरुवात ही सप्टेंबर पासून करायची असे ठरविले असून, उबरने २०१७ साली सुरु केलेल्या उबर इट्स ह्या फूड डीलेव्हरी सर्व्हिसला विकत घेण्याच्या विचारात आहे.
6 वर्षांपूर्वी -
ऑनलाईन बँकिंग विश्वात आता 'व्हॉट्सअँप पे' सुद्धा येणार.
सध्याच्या काळात प्रत्येकाला सर्वच गोष्टी अगदी बसल्या जागी करायच्या असतात. त्यातच आता बँकिंग सेवा सुद्धा मागे राहिलेली नाही. ऑनलाईन बँकिंगमूळे हल्ली पैशाचा व्यवहार अगदी सहज सोपा झाला आहे. एखाद्या व्यक्तीला पैसे पोहोचवण्यासाठी त्या व्यक्तीला भेटायला हवेच असे नाही. हे पैसे पोहोचवण्यासाठी आपल्या मोबाईल वर विविध अँप उपलब्ध आहेत. या अँपद्वारे आपण हव्या त्या वेळी हव्या त्या व्यक्तीशी व्यवहार करू शकतो.
6 वर्षांपूर्वी -
‘कॅफे कॉफी डे’ चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ अचानक बेपत्ता
देशातील सर्वात मोठे कॉफी रेस्टॉरंट ‘कॅफे कॉफी डे’ अर्थात, ‘सीसीडी’चे संस्थापक व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे अचानक बेपत्ता झाले आहेत. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मंगळुरू पोलिसांनी तातडीनं त्यांचा शोध सुरू केला असून सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत.
6 वर्षांपूर्वी -
चांद्रयान २: भारतीय शास्त्रज्ञांना श्रेष्ठ म्हणत त्यांचे पगार मोदी सरकारने कापले
दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज(दि.२८) आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांशीही दुसऱ्यांदा संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो ISRO) शास्त्रज्ञांचं आणि चांद्रयान-२ मोहिमेचं कौतुक केलं. याशिवाय त्यांनी अन्य अनेक विषयांवरही भाष्य केलं.
6 वर्षांपूर्वी -
विवो'चा नवीन बजेट स्मार्टफोन : विवो Y90
ह्या महागाईच्या जगात जिथे मोठमोठ्या कंपन्या महागडे असे स्मार्टफोन मार्केट मध्ये आणत आहेत तिथेच विवो’ने आणला आहे, आपल्या खिशाला परवडणारा असा स्मार्टफोन विवो Y90. हा स्मार्टफोन तब्बल ६,६९० रुपयांना भारतीय मार्केट मध्ये उपलब्ध होणार आहे. विवो Y90 हा विवो च्या Y सिरीज मधील सर्वात स्वस्त मोबाईल असून ह्या स्मार्टफोन फेस-अनलॉक फिचर सुद्धा आहे.
6 वर्षांपूर्वी -
पीक विमा कंपन्यांनी राज्यात २,२५५ कोटी नफा कमावला; ९८% शेतकरी मदतीविना: सीएसई रिपोर्ट
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊन देखील, विमा कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार घेऊन नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील चांदोरे येथील शेतकरी बाबूराव सुर्वे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दार ठोठावले. पंतप्रधान कार्यालयाने तत्काळ दखल घेऊन ही तक्रार केंद्रीय कृषी खात्याकडे ती वर्ग केली. केंद्रीय कृषी खात्यानेही ती कंपनीकडे पाठवण्याचे कागदी घोडे नाचवले. परंतु, या तक्रारीला ८ महिने उलटून गेल्यावरही विमा कंपनीने त्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही. दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांनी महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रीमियम गोळा केल्याचे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट या संस्थेने केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
आंध्रप्रदेश: भूमिपुत्रांना खाजगी नोकरीत ७५% आरक्षण; महाराष्ट्रात ५ वर्ष केवळ निर्धाराच्या मुठी आवळल्या
देशात रोजगाराच्या बाबतीत प्रथमच ऐतिहासिक गोष्ट घडली आहे. कारण आंध्र प्रदेशच्या अधिनियमातील महत्वाची तरतूद अशी आहे की, सरकारने एखाद्या उद्योगाला आर्थिक किंवा जमीन वगैरे अन्य सहाय्य दिलं असो की नसो, त्यांना या स्थानिक भूमिपुत्रांसाठी ७५ टक्के आरक्षणाचं धोरण राबवावंच लागणार आहे आणि सर्वांना काटेकोरपणे अमलात आणावं लागणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने तसा आदेशच प्रसिद्ध केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही : परराष्ट्र मंत्रालय
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठ्या संकटाचा सामना करत असताना पंतप्रधान इम्रान खान यांना अमेरिकन सकारकडून मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र अमेरिकेतील ट्रम्प सरकार देखील पाकिस्तानवर दहशतवादी कारवाई रोखण्यात तिथल्या विद्यमान सरकारला अपयश येत असल्याच्या करणारे ट्रम्प सरकार इम्रान खान यांच्यावर प्रचंड नाराज आहे. परिणामी जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर आपल्या शिष्टमंडळासोबत गेले असता त्यांना भेटण्यासाठी विमानतळावर कोणीही फिरकले नाहीत. धक्कादायक म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधान आणि शिष्टमंडळाला चक्क ट्रेनने प्रवास करावा लागला.
6 वर्षांपूर्वी -
मिशन चांद्रयान २: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; वैज्ञानिकांची 'उत्तुंग' भरारी
भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार होते.
6 वर्षांपूर्वी -
आज दुपारी प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज
भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण व्हायचे आहे.
6 वर्षांपूर्वी -
5G मुळे मेंदूचा कर्करोग, नपुंसकत्व व अल्झायमर असे भयंकर विकार होण्याची भीती: रशियन टाईम्स
भारतासह जगभरातील आघाडीच्या देशांमध्ये आता 5G च्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. कारण त्यामुळे करोडो उपभोक्ते काही क्षणांत काही जीबी डेटा जलदगतीने डाऊनलोड करू शकतील. दरम्यान सध्या जगभरात मोबाईल कंपन्यांसोबत ऑटोमोबाईल कंपन्यांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. भारतात तर इंटरनेटवाली कारही लाँच झाली आहे. दक्षिण कोरियामध्येतर 5Gचा वापर देखील वापर सुरू झाला आहे. तर चीनमध्ये परवानगी मिळाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सुविधा हव्या तर पैसे मोजावेच लागतील, आयुष्याभर टोल बंद होणार नाही: गडकरी
एकीकडे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सरकार टोलमुक्तीच्या बाता मारत सत्तेवर आलेले असताना महाराष्ट्राचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावेच लागतील, असे सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान-२ चं प्रक्षेपण रद्द, लवकरच नवीन वेळ जाहीर करणार
भारताच्या अत्यंत महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रक्षेपण काही तांत्रिक कारणामुळे थांबवण्याचा निर्णय इस्रो’ने घेतला आहे. ‘इस्रो’या संदर्भातली अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. पूर्वनियोजित योजनेप्रमाणे आज मध्यरात्री २ वाजून ५१ मिनीटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. परंतु ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच अधिकृतपणे जाहीर करणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं.
6 वर्षांपूर्वी -
चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार, काउंटडाऊन सुरू
भारताच्या स्पेस मिशनमधील नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. भारताच्या महत्वाकांक्षी मिशन चांद्रयान-२ मोहीमेला अवघे काही तास शिल्लक आहेत. उद्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार आहे. लौंचिंग नंतर ५२ दिवसाने चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल. इस्रोच्या या महत्त्वकांशी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचेही लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
गोपनीयता व सुरक्षेमधील त्रुटी; फेसबुकला ५ बिलियन अमेरिकी डॉलर्सचा दंड
अमेरिकेतील नियामक प्राधिकरणानं फेसबुक या जागतिक पातळीवरील लोकप्रिय समाज मध्यामाला, माहितीची गोपनीयता आणि सुरक्षेमधील त्रुटींसंबंधित कारणांमुळे तब्बल ५ बिलियन अमेरिकी डॉलर्स एवढा प्रचंड दंड प्रस्तावित केला आहे. संबंधित निर्णयाला न्यायिक विभागाची अधिकृत मान्यता मिळाल्यास या प्रकरणी ठोठावण्यात आलेला आतापर्यंतचा हा इतिहासातील सर्वाधिक दंड असेल.
6 वर्षांपूर्वी -
औरंगाबादेत चोरट्यांनी चक्क एटीएम लंपास केलं
बीड : चोरटे नेमकं काय चोरी करतील याचा नेम नाही. यापूर्वी अनेकांनी एटीएम फोडून पैसे लुटण्याचे प्रकार केले आहेत. मात्र आता चोरट्यांनी कळसच गाठल्याचे दिसत आहे. हा प्रकार घडला आहे चक्क सर्वाधिक वर्दळीच्या बीड बायपासच्या दोन्ही बाजूने मोठी नागरी वसाहत आणि व्यापारी संकुल तसेच मंगल कार्यालय असलेल्या ठिकाणी.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
IRB Infra Share Price | 44 रुपयांवर आली शेअर प्राईस, हा स्टॉक पुढे BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB