12 December 2024 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Stock Market Updates | पुढील आठवड्यात शेअर बाजाराची वाटचाल कशी असेल? | तज्ज्ञांचं मत

Stock Market Updates

मुंबई, 07 नोव्हेंबर | जागतिक निर्देशक, कॉर्पोरेट दुसऱ्या तिमाहीचे निकाल आणि देशांतर्गत आर्थिक डेटा पुढील आठवड्यात शेअर बाजारांची दिशा ठरवतील. असे मत बाजारातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लि. संशोधन प्रमुख संतोष मीणा म्हणाले, “या आठवड्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कल (एफआयआय) आणि अमेरिका आणि चीनच्या महागाईची आकडेवारी बाजाराच्या (Stock Market Updates) दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरेल.

Stock Market Updates. How will the stock market move next week, know the opinion of market experts. Global indicators, corporate second quarter results and domestic economic data will determine the direction of stock markets next week :

मागील आठवड्यात कमी ट्रेडिंग सत्रांनंतर, पुढील आठवड्यात नव्याने सुरुवात होईल. जागतिक स्तरावरील निर्देशक अजूनही सकारात्मक आहेत. मीना यांनी मात्र उच्च पातळीवर विक्रीचा दबाव राहील असे मत व्यक्त केले आहे. जागतिक घडामोडीवर आणि डेटावर बाजाराचं बारीक लक्ष राहील, असे देखील ते म्हणाले. अमेरिका आणि चीनच्या चलनवाढीचा डेटा 10 नोव्हेंबर रोजी समोर येणार आहे. त्याचप्रमाणे, देशांतर्गत औद्योगिक उत्पादन (IIP) डेटा 12 नोव्हेंबर रोजी येईल. पुढे मीना म्हणाले की, आता बाजारात दुसऱ्या तिमाहीच्या निकालाचा अंतिम टप्पा सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत काही विशिष्ट समभागांमध्ये चढ-उतार दिसून येतात.

मुथूट फायनान्स, ब्रिटानिया आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे तिमाही निकाल आठवडाभरात येतील. रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले, ‘या आठवड्यात सहभागी आयआयपी आणि सीपीआय आधारित महागाई सारख्या समष्टि आर्थिक डेटावर लक्ष ठेवतील, जे 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. ओएनजीसी आणि टाटा स्टीलचे तिमाही निकालही येणार आहेत.

मागील आठवड्यात बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स ७६०.६९ अंकांनी वा १.२८ टक्क्यांनी वधारला. सॅमको सिक्युरिटीजच्या इक्विटी रिसर्चच्या प्रमुख येशा शाह म्हणाल्या, “अमेरिका आणि चीनमधील चलनवाढीच्या आकडेवारीचा जागतिक बाजारपेठांवर परिणाम होईल. एवढेच नाही तर दलाल-स्ट्रीटचे गुंतवणूकदार देशांतर्गत चलनवाढीवरही लक्ष ठेवतील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Stock Market Updates know the opinion of market experts for next week.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x