22 January 2022 5:54 AM
अँप डाउनलोड

मुंबईत पेट्रोलचे दर गगनाला भिडले : ८० रुपयांचा टप्पा पार

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर ८० रुपये प्रति लिटर च्या वर पोहोचले आहेत. नवीन वाढीव दर आता ८० रुपये १० पैसे इतका प्रति लिटर झाला आहे. परंतु इतका उच्च दर जाण्याची ही मुंबईतील पहिलीच वेळ आहे आणि वर्षातील हा सर्वात मोठा आकडा आहे.

डिझेल ६७ रुपये १० पैसे तर पेट्रोल ८० रुपये १० पैसे असे नवीन उच्च दर राजधानी मुंबईत झाले आहेत. परंतु दररोज बदलत जाणाऱ्या दरांमुळे ही वाढ सहज लक्ष्यात येत नाही.

या पूर्वीचे मुंबईतील पेट्रोलचे दर;

२१ जानेवारी ७९ रुपये ९५ पैसे प्रति लिटर.

२० जानेवारी ७९ रुपये ७७ पैसे प्रति लिटर.

१९ जानेवारी ७९ रुपये ५८ पैसे प्रति लिटर.

१८ जानेवारी ७९ रुपये ४४ पैसे प्रति लिटर.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x