नवी दिल्ली: भारतातून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याला नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार दणका बसला आहे. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने एसबीआयसह अनेक बँकांना विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करून तिचा लिलाव करून विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव कधीही होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

तारीख केवळ रिकव्हरी ट्रिब्यूनलच ठरवू शकतो यावर माल्ल्याच्या वकीलांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, पीएमएलए न्यायालयानं या निर्णयावर १८ तारखेपर्यंत स्थगिती दिली आहे. तसंच मल्ल्याला आता मुंबई उच्च न्यायालयातही दाद मागता येणार आहे. बँकांना ९ हजार कोटी रूपयांचा चुना लावणाऱ्या मल्ल्यावर ब्रिटनमधील न्यायालयातही खटला सुरू आहे.

देशातील विविध बॅंकांना चूना लावून विजय माल्ल्याने मार्च २०१६` मध्ये लंडन येथे पलायन केले होते. विजय माल्ल्या याला परत देशात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय तपास संस्था प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप त्यांना यश आलेले नाही. गेल्या महिन्यात स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली भारतीय बँकांनी लंडनमधील एका न्यायालयत विजय मल्ल्या याच्या मालमत्ता जप्त करणे आणि दिवाळखोर घोषित करण्याची मागणी केली होती. विजय मल्ल्या भारतीय बँकांकडून नऊ हजार करोड रुपयांपेक्षा अधिक पैसे घेऊन ब्रिटेन येथे पळ काढला.

 

Web Title:  PMLA Court permitted Seized Assets of Vijay Mallya.

विजय माल्ल्याची मालमत्ता जप्त होणार, PMLA कोर्टाचा निर्णय