23 April 2024 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
x

ICICI Mutual Fund | मजबूत म्युच्युअल फंड योजना, बचतीवर 4.6 कोटी परतावा दिला, SIP करा आणि सयंमातून चमत्कार अनुभवा

Highlights:

  • ICICI Mutual Fund
  • SIP गुंतवणुकीवर रिटर्न
  • तज्ञांचे म्युचुअल फंड बाबत मत
  • म्युचुअल फंड योजनेबदल थोडक्यात
ICICI Mutual Fund

ICICI Mutual Fund | आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युचुअल फंडाने आपला 20 वर्षे कालावधी नुकताच पूर्ण केला आहे. या म्युचुअल फंडाचे AUM सध्या 14,227 कोटी रुपये आहे, जी या श्रेणीतील एकूण AUM च्या तुलनेत 68 टक्के अधिक आहे. 31 ऑक्टोबर 2002 रोजी या म्युचुअल फंड योजनेत ज्या लोकांनी 10 लाख रुपये एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 4.6 कोटी रुपये झाले आहे.

म्हणजेच त्या गुंतवणूकदाराला या म्युचुअल फंडाने वार्षिक सरासरी 21.2 टक्के चक्रवाढ परतावा कमावून दिला आहे. त्याचप्रमाणे काळात निफ्टी-50 मध्ये ही गुंतवणूक केली असती तर आता 17.4 टक्के दराने 2.5 कोटी रुपये परतावा मिळाला असता. (ICICI Prudential Multi-Asset Fund Growth latest NAV)

SIP गुंतवणुकीवर रिटर्न

जर तुम्ही आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युचुअल फंडमध्ये स्थापनेपासून आतपर्यंत 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली असती तर, तुम्हाला सध्या 1.8 कोटी रुपये परतावा मिळाला असता. या दरम्यान तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक केवळ 24.1 लाख रुपये झाली असती. या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 17.4 टक्के दराने परतावा कमावून दिला आहे.

तज्ञांचे म्युचुअल फंड बाबत मत

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युचुअल फंडचे एमडी आणि सीईओ निमेश शाह यांनी माहिती दिली आहे की, आयसीआयसीआयची ही म्युचुअल फंड योजना मालमत्ता वाटपाचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करते. आणि आम्हाला आनंद आहे की आमच्या ग्राहकांनी या योजनेत गुंतवणूक करून बक्कळ पैसा कमावला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या व्यवस्थापकांनीही जबरदस्त कामगिरी केली आहे.

या म्युचुअल फंडाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही योजना मुख्यतः इक्विटी, डेट, सोने यासारख्या साधनात गुंतवणूक करते. जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो, तेव्हा कोणती योजना किती परतावा देईल, किंवा चांगली कामगिरी करेल की नाही, याबद्दल आपण काही सांगू शकत नाही.

म्युचुअल फंड योजनेबदल थोडक्यात

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युचुअल फंड स्कीम ही एक ओपन एंडेड स्कीम आहे. ही म्युचुअल फंड स्कीम अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करते. आणि या योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 5 वर्षात सरासरी वार्षिक 12.83 टक्के परतावा दिला आहे, तर मागील 3 वर्षात या फंडने लोकांना सरासरी वार्षिक 19.80 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ICICI Prudential Multi-Asset Fund Growth fund NAV today on 28 May 2023.

हॅशटॅग्स

ICICI Mutual fund(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x