25 April 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

संसदेच्या नव्या इमारतीचं उदघाटन आणि शाहरुख खानचं मोदींची स्तुती करणारं ट्विट ही CBI रडारवरील समीर वानखेडेंसाठी धोक्याची घंटा?

Highlights:

  • New Parliament Inauguration
  • संसदभवनाच्या नव्या इमारतीबाबत शाहरुखखानचे ट्विट
  • आर्यन खान प्रकरण आणि समीर वानखेडे CBI रडारवर
Bollywood superstar Shah Rukh Khan

New Parliament Inauguration | बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटांद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख खानचे हे दोन्ही सिनेमे यावर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. तत्पूर्वी, पठाण चित्रपटातील ‘भगवी बिकनी’ वादानंतर भाजपने शाहरुख खानला प्रचंड लक्ष केलं होतं. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी शाहरुख खानवर धार्मिक टिपण्या करत खळबळजनक वक्तव्य करत केली होती. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी शाहरुख खानची प्रेत यात्रा देखील काढली होती. मात्र आता भाजपचे नेते आणि पदाधिकारी अचानक शाहरुख खानचे गुणगान गाऊ लागले आहेत.

आता शाहरुख खान आणखी एका कारणामुळे भाजपसाठी चर्चेत आला आहे. शाहरुख खानचे एक ट्विट समोर आले आहे, जे येताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. शाहरुख खानच्या या ट्विटवर युजर्स जोरदार कमेंट करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मुद्द्यावर शाहरुख खानने केले ट्विट आहे.

संसदभवनाच्या नव्या इमारतीबाबत शाहरुखखानचे ट्विट
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान त्याच्या ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटांसह त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी शाहरुख खानने याबाबत ट्विट केले आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमधील ऑडिओ वरून तो स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झाल्याचा अंदाज येतोय. म्हणजे व्हिडिओ ट्विट करण्यापूर्वी शाहरुख खानचा आवाज हा स्टुडिओमध्ये रेकॉर्ड गेला असावा असं म्हटलं जातंय आणि भाजपकडून आधीच संपर्क झाला होता का अशी देखील शंका व्यक्त होऊ लागली आहे.

शाहरुख खानने संसदेच्या नव्या अधिवेशनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. नव्या संसद भवनाच्या या व्हिडिओमध्ये शाहरुख खान आपल्या आवाजात या नव्या इमारतीबद्दल सांगत आहे. शाहरुख खानच्या आवाजाने चाहत्यांची मने जिंकली. हा व्हिडिओ शेअर करताना शाहरुख खानने एक कॅप्शनही लिहिलं आहे. ज्यामध्ये किंग खानने नव्या संसद भवनाचे कौतुक केले आहे. शाहरुखखानच्या या व्हिडिओवर कमेंट करत अनेक भाजप नेते आणि पदाधिकारी किंग खानचे कौतुक करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे संसदेची नवी इमारत ही जनतेच्या पैशातून उभी राहिली असली तरी शाहरुख खानाने मोदींना मेन्शन करत त्याचे श्रेय नरेंद्र मोदी यांना दिल्याचं म्हटलं स्पष्ट होतंय. त्यामुळे हा PR आधीच निश्चित झाला होता का? आणि शाहरुख खानसोबत भाजप श्रेष्ठींचा समेट झाला आहे का? अशी चर्चा सुद्धा झाली आहे. पण याचा पुढचा अर्थ काय?

आर्यन खान प्रकरण आणि समीर वानखेडे CBI रडारवर
मध्यंतरी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अत्यंत अडचणीत होता. मात्र सध्या समीर वानखेडे अडचणीत आहेत. NCB आणि CBI अशा दोन्ही संस्था समीर वानखेडे यांच्या विरोधात आहेत. तसेच सध्या २५ कोटीच्या खंडणी प्रकरणी विशिष्ट रक्कम समीर वानखेडे यांनी स्वीकारल्याचा देखील आरोप आहे. सध्या प्रकरण हायकोर्टात असून दुसऱ्या बाजूला समीर वानखेडे CBI च्या रडारवर आहेत. हायकोर्टाने समोर वानखेडेंना विशिष्ठ काळासाठी अटकेपासून संरक्षण दिलं असलं तरी त्यांना भविष्यात केव्हाही अटक होऊ शकते असं म्हटलं जातंय.

मात्र एकाबाजूला भाजपचा शाहरुख खानसोबत आजच्या ट्विटने समेट झाल्याचं म्हटलं जातं असताना, दुसऱ्याबाजूला ही समीर वानखेडे यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकानीं वर्तविला आहे. त्यामुळे पुढे CBI किती वेगाने कामाला लागणार ते पाहावं लागणार आहे.

News Title: Bollywood superstar Shah Rukh Khan Tweet on New Parliament Inauguration check details on 28 May 2023.

हॅशटॅग्स

#Bollywood superstar Shah Rukh Khan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x