24 September 2023 6:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vivo T2 Pro 5G | विवो T2 प्रो 5G स्मार्टफोनची इतकी क्रेझ का आहे? बजेट किंमतीत दमदार फीचर्स आणि स्पेफिकेशन्स Numerology Horoscope | 24 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Stocks to Buy | गुंतवणूकीसाठी ही टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट सेव्ह करा Mufin Green Share Price | श्रीमंत करतोय शेअर! मागील 5 वर्षांत शेअरने 2077% परतावा दिला, काल 20% परतावा दिला, किंमत 68 रुपये Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 24 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तुफान तेजीत येणार, कंपनीला एका मागून एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा सपाटा, फायदा घेणार?
x

महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात, रामदेव बाबांचं धक्कादायक विधान

Yoga Guru Ramdev Baba

Baba Ramdev | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यात ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाची भेट घेऊन राज्यपालांच्या बदलण्याच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपाल बदलीबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तत्पूर्वी, रामदेव बाबा ठाण्यातील योगा कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.

रामदेव बाबांचं धक्कादायक विधान :
अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, की त्या शंभर वर्षापर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत, असं योगगुरु रामदेव बाबा म्हणाले. त्या नेहमीच तोलून मापून खातात, खुश राहतात, जेव्हा पाहावं तेव्हा लहान मुलांप्रमाणे हसत असतात, साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केल्याने अनेकांना धक्का बसला.

नेमकं काय घडलं :
महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांना योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यांनंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव यांनी एक विधान करत म्हटले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे बोलताना रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असे रामदेव बाबा म्हणाले.

मी राज्यपालांना जवळून ओळखते – अमृता फडणवीस
अमृता फडणवीस यांनी राज्यपालांची पाठराखण करत मोठे वक्तव्य केले आहे. मी राज्यपालांना जवळून ओळखते. त्यांना मराठी भाषेचे प्रेम आहे. ते एकमेव राज्यपाल आहेत जे मराठी शिकत आहेत. मराठी बोलण्याच्या वेगात ते काही बोलून जातात, त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यांना मराठी भाषेवर प्रेम आहे. मनापासून मराठी व्यक्तीवर प्रेम करणारे राज्यपाल आहेत.

स्त्रीयांनी सशक्त राहण्याची गरज
श्रद्धाबाबत झाले त्याबाबत दुःख होतंय. खोलात जावून तिला न्याय मिळाला पाहिजे. असा न्याय मिळाला पाहिजे की सगळे हादरले पाहिजेत. स्त्रीयांवर हात उचलायची, कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देणे गरजेचे आहे. भारताला पुढे न्यायचे आहे तर स्त्रीयांच्या सहकार्याची गरज आहे. स्त्रीयांनी सशक्त राहण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Yoga Guru Ramdev Baba statement on women wearing saree check details on 25 November 2022.

हॅशटॅग्स

#Yoga Guru Ramdev Baba(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x