27 March 2023 10:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या Viral Video | अर्रर्रर्र!! गायीला वाचवायला नाल्यात उतरला आणि पुढे काय झाल ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही  
x

राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अवमान केलाच नाही, त्यांनी अडीच वर्षांत खूप चांगले काम केलं - चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule

BJP Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत राहतात. अलीकडेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचा सर्वत्र निषेध होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजत प्रवक्ते व खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राजकीय वादंग सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवराय हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असं वक्तव्य केलं होतं. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माफीनाम्यावर बोलताना भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाला पत्र लिहिली, असं म्हटलं. या दोघांच्या वक्तव्याने मोठ वाद निर्माण झाला. राज्यभरात निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोश्यारींना वृद्धाश्रमात पाठवा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. तसेच कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली असून भाजपने राज्यपालांची बाजू घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा अवमानच केला नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते. त्यांनी आता काही बोलणे म्हणजे विनोद केल्यासारखे आहे. राज्यपालांबद्दल उद्धव ठाकरे यांनी असं बोलणे योग्य नाही. राज्यपालांवर अशा पद्धतीने कोणी टीका करत नाही. त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे कोणीही समर्थन करत नाही. पण राज्यपालांची वृद्धावस्था काढली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हीच संस्कृती शिकवली का?, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण राज्यपालांनी अडीच वर्षांमध्ये खूप चांगले काम केले. ते तुम्ही सगळे विसरले का? त्यांनी कधी छत्रपतींचा अपमान केला नाही. बोलण्यामध्ये काहीतरी आक्षेपार्ह आलं आणि हा प्रश्न निर्माण झाला. या विषयाच समर्थन कोणी करणार नाही. मात्र त्यांनी मागील काळात केलेलं काम बघितलं पाहिजे, असं सांगतानाच व्यक्तिगत टीका टिप्पणी करू नका. हे महाराष्ट्राला शोभण्यासारखे नाही, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP State President Chandrashekhar Bawankule protect governor over controversial statement against Chhatrapati Shivaji Maharaj check details on 25 November 2022.

हॅशटॅग्स

#Chandrashekhar Bawankule(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x