निवडणुकांसाठी वाट्टेल ते? करकरे शहीदच पण पोलीस अधिकारी म्हणून चुकीचे: सुमित्रा महाजन
भोपाळ : भारतीय जनता पक्षाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या विधानाने निर्माण झालेला वाद संपलेला नसताना आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देखील शहीद हेमंत करकरेंविषयी धक्कादायक भाष्य केले आहे. २६/११ हेमंत करकरे शहीद झाले. मात्र महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख या पदावर काम करताना त्यांची भूमिका अत्यंत चुकीचीच होती, असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतःच्या पक्षाचा तिखट हिंदुत्वाचा अजेंडा रेटण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते याचा पुन्हा प्रत्यय आला आहे.
सुमित्रा महाजन यांनी इंडियन एक्स्प्रेसला प्रतिक्रिया देताना हेमंत करकरे यांच्याविषयी भाष्य केले. सुमित्रा महाजन म्हणतात, माझ्याकडे ठोस पुरावे नाहीत. पण काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि हेमंत करकरे हे मित्र होते असे मी ऐकून आहे. दिग्विजय सिंह हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप करायचे. संघ बॉम्ब तयार करत असल्याचा आरोप ते करायचे, याकडेही महाजन यांनी लक्ष वेधले.
सुमित्रा महाजन यांनी दिलीप पाटीदार या तरुणाचा मुद्दाही उपस्थित केला. दिलीप पाटीदार याला महाराष्ट्र एटीएसने २००८ साली इंदूरमधून अटक केली होती. मात्र, त्यानंतर दिलीप पाटीदार हा बेपत्ता झाला असून या प्रकरणी न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती, असे महाजन यांनी सांगितले. दिलीप पाटीदारचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. याप्रकरणाबाबत पोलिसांनी भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे, असेही महाजन यांनी म्हटले आहे.
सुमित्रा महाजन यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरुन सुमित्रा महाजन यांना प्रत्युत्तर दिले. देशासाठी शहीद झालेल्या व्यक्तीसोबत माझे नाव जोडणे हे माझ्यासाठी अभिमानास्पदच आहे. देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना माझा नेहमीच विरोध राहणार, असे सांगत त्यांनी भाजपावर पलटवार केला आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा