14 December 2024 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

मणिपूरचा रोष? राहुल गांधींच्या स्वागताला लोकं रस्त्यावर, तर NDA सहकारी आणि मिझोरामचे मुख्यमंत्री मोदींसोबत स्टेजवर जाणं टाळणार

Mizoram CM Zoramthanga

Mizoram CM Zoramthanga | मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येथे येतील तेव्हा त्यांच्यासोबत व्यासपीठावर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी ३० ऑक्टोबर रोजी राज्याच्या पश्चिम भागातील मामित शहराला भेट देण्याची शक्यता असून ते येथे भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची शक्यता आहे.

झोरामथांगा यांनी बीबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मिझोराममधील सर्व लोक ख्रिश्चन आहेत. जेव्हा मणिपूरच्या लोकांनी (मेतेई समुदायाने) तेथे शेकडो चर्च जाळले, तेव्हा ते (मिझोरामचे लोक) अशा कल्पनेच्या पूर्णपणे विरोधात होते. त्यामुळे मोदी सरकारविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि अशा वेळी भाजपशी सहानुभूती बाळगणे माझ्या पक्षासाठी चांगले ठरणार नाही. ‘पंतप्रधानांनी एकट्याने येऊन स्वत: व्यासपीठाची सूत्रे हाती घेतली तर बरे होईल आणि मी स्वतंत्रपणे प्रचार करतो असे ते म्हणाले.

राज्यात ७ नोव्हेंबर ला विधानसभा निवडणुका होणार आहेत. झोरामथांगा यांचा मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील ईशान्य लोकशाही आघाडीचा (एनईडीए) भाग असून केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) मित्रपक्ष आहे. पण मिझोराममध्ये एमएनएफ भाजपसोबत नाही.

मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणाले की, एमएनएफ एनडीए आणि नेडामध्ये सामील झाला कारण तो पूर्णपणे कॉंग्रेसच्या विरोधात होता आणि त्याला त्याच्या नेतृत्वाखालील कोणत्याही आघाडीचा भाग व्हायचे नव्हते. म्यानमार, बांगलादेश आणि मणिपूरमधील ४० हजारांहून अधिक लोकांनी राज्यात आश्रय घेतला आहे. झोरामथांगा म्हणाले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे जेणेकरून लोक त्यांच्या मूळ राज्यात परत जाऊ शकतील. मात्र मोदी सरकार तसे करताना दिसत नसल्याने लोकांमध्ये मोदी सरकार विरोधात रोष शिगेला पोहोचल्याचं निदर्शनास येतं आहे.

News Title : Mizoram CM Zoramthanga will not share stage with PM Modi 24 October 2023.

हॅशटॅग्स

#Mizoram CM Zoramthanga(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x