13 May 2021 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पेट्रोल दरवाढ | जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही ते तरी काढून घेऊ नका - शिवसेना राज्याला अधिक लस किंवा इतर कोरोनासंबंधित साहित्य द्या असे एक तरी निवेदन फडणवीसांनी मोदींकडे दिले का? - बच्चू कडू भाजपाची सत्ता असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ व्यवस्थापनाची उच्च न्यायालयाकडून पोलखोल Health First | झोपेत असताना घोरत असाल तर हे करा त्यावर उपचार योगी सरकारच्या कृपेने युपीतील कोरोना रुग्ण आत्मनिर्भर | इस्पितळात घरूनच खाटा आणण्याची वेळ Health First | ब्रोकोली ही भाजी आहे आरोग्यास लाभदायक विषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही? | मुंबई हायकोर्टाचा केंद्राला प्रश्न
x

पेट्रोल दिवाळीत सामान्यांचं महागाईने दिवाळं काढणार, इंधन दर शतकाच्या दिशेने

मुंबई : देशभरात पेट्रोल दर शंभरी गाठण्याची शक्यता आहे. त्यात डिझेलने सुद्धा ८० चा टप्पा ओलांडला आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल तसेच डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी १३ पैशांनी महागले आहेत. यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी प्रति लिटर ९०.३५ रुपये आणि डिझेलसाठी प्रति लिटर ७८.८२ रुपये मोजावे लागत आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पेट्रोलने नव्वदी पार केल्याने आता हे दर शंभरीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. चालू आर्थिक वर्षात इंधनाचे दर चांगलेच भडकले आहेत. आतापर्यंत फक्त २९ मे ते ५ जुलैदरम्यान दरात घसरण झाली होती. त्यानंतर ६ जुलै ते २5 सप्टेंबरदरम्यान बहुतांश दिवस इंधनाचे दर वाढले. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने देशांतर्गत इंधन महाग होत आहे. पण मोदी सरकारने आणि राज्य सरकारने लादलेले भरमसाट करसुद्धा या दरवाढीला कारणीभूत आहेत. कच्चे तेल महाग होत असतानाही दोन्ही सरकारे कर कमी करून सामान्यांना दिलासा देण्यास अजिबात तयार नाहीत. त्यातून दर भडकत असून, महागाईमुळे लोकांची होरपळ सुरू आहे.

त्यात दिवाळीत सामान्यांच महागाईमुळे दिवाळं निघू शकत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान विरोधक आणि प्रसार माध्यम महागाईवरून मोदी सरकारला म्हणावं तसं धारेवर धरताना दिसत नाहीत हे सुद्धा वास्तव सामान्यांच्या भविष्यातील अडचणी वाढवणारं ठरू शकत असं अनेक तज्ज्ञांना वाटतं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1531)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x