महापुरुषांचे मोठे पुतळे उभारण्याऐवजी शाळा आणि महाविद्यालये उभारणे गरजेचे: रघुराम राजन

नवी दिल्ली : सर्वच अधिकार पंतप्रधान कार्यालयात एकवटल्याने इतर मंत्र्यांकडे अधिकार नाहीत त्यामळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीने बेजार झाली असून नजिकच्या काळात ती आणखी खोलात जाईल, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी राजन यांनी काही सूचना केल्या आहेत. भांडवली बाजार आणि गुंतवणूक, जमीन, कामगार कायदा या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज राजन यांनी व्यक्त केली होती.
हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव वाढवणार नाही, तर भारताला आर्थिक विकासाच्या मार्गावरुन भरकटवण्याचं काम करेल असं मत रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. इंडिया टुडे मॅगजिनमध्ये लिहिलेल्या ‘How to fix the economy’ या लेखात रघुराम राजन यांनी आपलं परखड मत मांडलं आहे.
“भारताच्या आर्थिक विकासाला आहोटी लागली असून, अर्थव्यवस्थेत आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. अशा अवस्थेत पंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण आणि अधिकारहीन मंत्री ही स्थिती अर्थव्यवस्थेसाठी अपायकारक आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी सरकारच्या सामाजिक-राजकीय अजेंठ्यावर टीका करताना रघुराम राजन यांनी सांगितले की, ” राष्ट्रीय किंवा धार्मिक महापुरुषांचे मोठे मोठे पुतळे उभारण्याऐवजी भारताला जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये उभारणे गरजेचे आहे. ज्यामुळे येथील मुलांचा मानसिक विकास होईल. ते जास्त सहिष्णु आणि एकमेकांशी सन्मानाने वागायला शिकतील. यामुळे ही मुलं भविष्यातील स्पर्धात्मक जगात आपली जागा निर्माण करण्यात यशस्वी होतील.”
सरकारी यंत्रणांच्या दुरुपयोग होत असल्यावरून सुद्धा रघुराम राजन यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. सरकार आपल्याच अधिकारांना कमकुवत करत आहे. कारण, त्यांना भविष्यातील सरकारद्वारे अशाच कारवाईची भीती वाटेल, असे राघुराम राजन यांनी म्हटले आहे.
RBI Former Governor Raghuram Rajan Slams PM Narendra Modi over Indian Economy How to Fix the Economy Issues
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Olatech Solutions Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 5 महिन्यांत 300% पेक्षा अधिक परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?
-
IndusInd Bank Share Price | बँकिंग शेअर, तिमाही निकालानंतर स्टॉकवर तज्ज्ञांकडून नवी टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
-
Deep Diamond India Share Price | 1 वर्षात 842% परतावा देणाऱ्या कंपनीने जाहीर केले स्टॉक स्प्लिट, स्टॉक स्प्लिटचा फायदा घेणार?
-
Lotus Chocolate Company Share Price | या शेअर सोबत मुकेश अंबानींचं नावं जोडलं गेलं, 1 महिन्यात 122% परतावा, स्टॉक डिटेल्स
-
GCM Capital Advisors Share Price | अबब! फक्त 5 रुपयाचा पेनी शेअर, दर दिवशी 20% परतावा, खरेदी करावा?
-
Anant Raj Share Price | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील जबरदस्त शेअर, 7 महिन्यांत 180% परतावा दिला, खरेदी करणार?
-
Richest Report | सर्वात श्रीमंत 1% भारतीयांकडे देशातील 40% पेक्षा जास्त संपत्ती, अर्ध्या लोकसंख्येकडे फक्त 3% संपत्ती
-
Lotus Chocolate Company Share Price | विस्तार मुकेश अंबानींच्या उद्योगाचा, लॉटरी लागली चॉकलेट कंपनीच्या शेअरची, पैसा 3 पट
-
Ducol Organics and Colours Share Price | जबरदस्त IPO! शेअरची शानदार एंट्री, लिस्टिंगला 43% परतावा, आज 5% वाढला
-
2023 Hyundai Grand i10 Nios Facelift | 2023 हुंडई ग्रांड i10 निओस फेसलिफ्ट लॉन्च, किंमत 5.69 लाख रुपये