डिजीटल शिक्षण, रिलायन्सकडून Jio Glass सेवा लाँच
मुंबई, 15 जुलै : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली मोठी कंपनी असणारी Google आता Jio प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. Jio Platforms Limited चा 7.8 टक्के वाटा Google कडे असेल. अशा प्रकारे आता JPL मध्ये फेसबुक, इंटेल (Intel), क्वालकॉम (Qualcomm) आणि गुगल असे 4 मोठे भागीदार असतील. Google च्या गुंतवणुकीची घोषणा RIL चे मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) केली.
गुगलने एकूण 33,737 कोटी रुपये JIO प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणार असल्याचं मान्य केलं आहे, असं अंबानी म्हणाले. त्यांची ही गुंतवणूक फक्त आर्थिकच नव्हे तर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट असेल. Facebook, Intel, Qualcomm आणि Google या 4 मोठ्या भागिदारांखेरीज एकूण 14 गुंतवणूकदार जिओमध्ये असतील. त्यातले 6 तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रातले गुंतवणूकदार आहेत तर 3 sovereign funds आहेत. अशा 14 गुंतवणूकदारांसह Jio ने 1,52,056 कोटींचा निधी उभा केला आहे, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं.
दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आज जिओ ग्लास सेवेची घोषणा करण्यात आली. जिओ ग्लास ही थ्रीडी इंटरॅक्शन सेवा असणार असून यामध्ये संवाद साधणाऱ्या व्यक्तीची हॉलोग्राम प्रतिकृती पाहता येणार आहे. प्रमुख्याने डिजीटल शिक्षणाचे ध्येय समोर ठेऊन जिओ ग्लास लाँच करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.
रिलायन्सच्या किरण थॉमस यांनी जीओ ग्लासची घोषणा केली. “जिओ ग्लासमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना व्ह्यर्चूअल थ्रीडी क्लास रुमच्या माध्यमातून संवाद साधता येईल. या माध्यमातून हॉलोग्राफीक तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षण घेता येईल. यासाठी जिओने रिअॅलिटी क्लाउडचे तंत्रज्ञान वापरुन रियल टाइम टेलिकास्ट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. जिओ ग्लासेसमुळे पुस्तकातून भूगोल शिकणं इतिहास जमा होणार असून त्याचा प्रत्यक्ष अनुभव हॉलोग्रामच्या माध्यमातून घेता येईल,” असं थॉमस म्हणाले.
News English Summary: The Jio Glass service was announced today at Reliance Industries’ annual general meeting. Jio Glass will be a 3D interaction service that will feature a hologram replica of the person communicating.
News English Title: Reliance Jio Announces New Jio Glass For 3d Interactions Holographic Content News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News