13 December 2024 3:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

How To Check CIBIL Score Free | तुम्हाला माहित आहे सिबिल स्कोर अगदी फ्रीमध्ये सुद्धा चेक करता येतो, कसं ते जाणून घ्या

How to check CIBIL score Free

How to Check CIBIL Score Free | प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात कधीनाकधी कर्ज घेण्याची गरज पडते. सध्याच्या युगात माणसांच्या गरजा जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे कर्ज घेण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. कर्ज देताना प्रत्येक बँक तुमचा सिबिल स्कोर किती आहे हे तपासत असते. सिबिल स्कोर चेक करण्यासाठी त्याचा एक तीन अंकी नंबर असतो. यावर तुमच्या आर्थीक व्यवहारांची सर्व माहिती मिळते. यामध्ये तुम्ही किती वेळा कर्ज घेतलं आहे. घेतलेलं कर्ज किती कालावधीमध्ये परत केलं आहे ही सर्व माहिती मिळते. (Is it OK to check CIBIL score online?)

देशातील चार क्रेडिट रेटिंग कंपन्यामध्ये सिबिल हे एक आहे. जगभरात सर्वाधिक प्रमाणत याचा वापर होतो. सिबिल स्कोर ३०० ते ९०० च्या आसपास असतो. जेव्हा तुमचा सिबिल स्कोर ९०० असतो तेव्हा तुम्हाला कोणतीही बँक सहज कर्ज देते. तसेच कोणतेही क्रेडीट कार्ड तुम्हाला सहज उपलब्ध होते. (Is 750 a good CIBIL score?)

सिबिल स्कोर तपासण्यासाठी बँकेच्या ऍप व्यतिरीक्त काही बेवसाईटस्ट आहेत.त्यावर देखील तुम्ही सिबिल स्कोर तपासू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत. तुम्ही अगदी फुकटात सिबिलच्या बेवसाईटवर तुमचा सिबिल स्कोर तपासू शकता. त्याव्यतिरिक्त तुम्ही सबस्क्रिप्शन प्लॅन घेऊन देखील तुमचा सिबिल स्कोर तपासू शकता. फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन प्लॅन घेतल्यावर वर्षातून एकदाच सिबिल स्कोर तपासण्याची संधी मिळते. यामध्ये तुम्हाला पेड प्लॅनचा देखील पर्याय आहे. (How to calculate the CIBIL score?)

फ्रीमध्ये सिबिल स्कोर कसा तपासावा?

लॉगइन करा
https://www.cibil.com/ ही सिबिल स्कोर तपासण्याची वेबसाईट आहे. यावर गेल्यानंतर उजव्या दिशेला असलेल्या गेट युअर सिबिल स्कोर या पर्यायावर क्लिक करा. इथे तुम्हाला काही सब्सक्रिप्शनचे पर्याय दिसतील. थोडं स्क्रोल केल्यावर फ्रीमधला पर्याय दिसेल.

तुमचे अकाउंट तयार करा
अकाउंट तयार करण्यासाठी इथे तुम्हाला तुमचे नाव ईमेल आयडी आणि युजरनेम टाकावे लागेल. तसेच स्वत:चा पासवर्ड तयार करून तो इथे टाकावा लागेल. यामध्ये तुम्हाला आयडी प्रूफ विचारला जाईल. त्यासाठी पॅन कार्ड, वोटर कार्ड, पासपोर्ट नंबर, आधारकार्ड या पैकी एकाची गरज पडेल. त्यानतंर जन्म तारिख, पिन नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. पुढे कंटीन्यूवर क्लिक करा.

तुमची माहिती अथवा ओळख तपासा
यामध्ये तुम्ही दिलेली माहिती खरी आहे का? हे तपासले जाईल. यासाठी तुम्ही जो मोबाईल क्रमांक येथे टाकला आहे त्यावर एक ओटीपी येईल. हा ओटीपी स्क्रीनवर दिसत असलेल्या ठिकाणी टाकावा लागेल. त्यानंतर पुन्हा कंटीन्यूवर क्लिक करा.

डॅशबोर्ड
तुम्ही भरलेली माहिती तपासल्यावर इथे एक नवीन विंडो ओपन होईल. याबाबत तुम्हाला तुमच्या इमेल अकाउंटवर एक मेल येईल किंवा मेसेज येईल. त्यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या गो टू डॅशबोर्डवर क्लिक करावे.

सिबिलक्सोर
पुढे माय स्कोर डॉट सिबिल डॉट कॉम असा पर्याय तुम्हाला दिसेल. इथे तुम्ही फ्रीमध्ये तुमचा सिबिल स्कोर किती आहे ते तपासू शकता. (Is 600 a good CIBIL score?)

अशा पद्धतीने अकाऊंट तयार करून एकदा तुम्ही सिबिल स्कोर चेक करू शकता. त्यानंतर https://myscore.cibil.com/ या वेबसाईटवर मेंबर लॉगइन केल्यावर तुम्ही सिबिल स्कोर पुन्हा तपासू शकता. जर एकाच वर्षांत तुम्हाला दोन वेळा सिबिल स्कोर तपासायचा असेल तर पेड प्लॅन घ्यावा लागेल. यासाठी तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही ही माहिती मिळवू शकता. (How to check CIBIL Score with Credit Pass?)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: How to check CIBIL score Free.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x