RBI'ने DHFL विरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु केली; गुंतवणूकदारांचे ६,००० कोटी धोक्यात?
नवी दिल्ली: डीएचएफएलमध्ये (Dewan Housing Finance Corporation Limited) मुदत ठेवींच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) या खासगी गृहकर्ज संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून तिच्याविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने या गुंतवणूकदारांचे ६ हजार कोटी रुपये कधी व कसे परत मिळणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
रिझव्र्ह बँकेने बुधवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, कंपनीच्या कारभारासंबंधी चिंता आणि अनेकांची देणी थकविणे आणि दायीत्वाच्या पूर्ततेतील कसूर लक्षात घेऊन डीएचएफएलचा (DHFL) कारभार प्रशासकाकडे सोपवत असल्याचे स्पष्ट केले. इंडियन ओव्हरसीज बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. सुब्रमणियन यांची डीएचएफएलचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बॅंकेकडून घेतलेली ३१,००० कोटींची कर्जे शेल कंपन्यांमध्ये (Fake Companies) गुंतवल्याचा आरोप झाल्यानंतर “डीएचएफएल’ गोत्यात आली होती. रोकड टंचाईमुळे म्युच्युअल फंड कंपन्या, बॅंका, बॉंडधारक आणि इतर धनकोंची कर्जांची परतफेड करण्यास कंपनीला अपशय येत होते. दरम्यान, “डीएचएफएल’च्या संचालक मंडळाने खासगी संस्थांच्या माध्यमातून कंपनीचे अंतर्गत लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. त्याशिवाय कर्जाचे इक्विटीमध्ये रूपांतर करून १५,००० कोटी फेडण्याचा प्रस्ताव कंपनीने सादर केला होता.
दरम्यान, “डीएचएफएल’चे मुख्य प्रवर्तक असलेल्या वाधवा कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. वाधवा कुटुंबियांची “डीएचएफएल’मध्ये ३९ टक्के मालकी आहे. यापूर्वीच वाधवा कुटुंबियांविरोधात कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवा तसेच धीरज वाधवा यांची सक्तसवुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली होती.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News