लंडन : ब्रिटीश संसदेने अंमलबजावणीच्या फक्त १७ दिवसआधी ब्रेक्झिटचा प्रस्ताव फेटाळल्याने ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा धक्का बसला आहे. युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा प्रस्ताव दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे. ब्रिटनच्या संसदेने ब्रेक्झिट करारावरील प्रस्तावित बदलांना २४२ विरुद्ध ३४१ अशा मोठ्या फरकाने संख्येने नाकारलं आहे.
युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबतच्या ब्रेग्झिट समझोत्यावर ब्रिटनच्या प्रतिनिधीगृहात मंगळवारी मतदान झाले. हा करार प्रतिनिधी गृहाने पुन्हा एकदा फेटाळला आहे. ब्रेग्झिट करारावर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पंतप्रधान थेरेसा दुसऱ्यांदा हादरा बसला असून ३९१ विरुद्ध २४२ मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. यंदा थेरेसा मे यांना १४९ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. मे यांच्या हुजूर पक्षाच्या ७५ खासदारांनी ब्रेग्झिटविरोधात मतदान केले.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		