28 March 2024 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

कंगना रनौत आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात आ. सरनाईकांकडून हक्कभंग प्रस्ताव

Shivsena MLA Pratap Sarnaik, Pakistani credit card, Kangana Ranaut, Privilege motion

मुंबई, १४ डिसेंबर: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांनी अभिनेत्री कंगना रनौत (Bollywood Actress Kangana Ranaut) यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव (Privilege Motion) दाखल केला आहे. तसेच, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्धही सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वत: ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2020 (Maharashtra Legislature Winter Session 2020 आजपासून सुरु झाले. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या वेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, काही लोकांनी माझ्या विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार केला. खोट्या बातम्या परसवल्या. ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची राज्य आणि देशपातळीवर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. काही लोकांनी तर माझ्या घरी इडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड सापडल्याचा दावा केला. राफेलचे कागदपत्रं मिळाले, ट्रम्प यांच्यासोबत भागिदारी आणि काहींनी विदेशात निर्माण केलेल्या मालमत्तेचे दस्तऐवज सापडल्याचे म्हटले. परंतू, हे सर्व धादांत खोटे आहे, असे म्हणत आपल्यावरील सर्व आरोप प्रताप सरनाईक यांनी फेटाळून लावले.

माझ्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचे खोटे ट्विट कंगना रानौत हिने केले होते. त्यामुळे देशभरात माझी आणि माझ्या कुटुंबीयांची बदनामी झाली. माझ्या कुटुंबीयांना या सगळ्याचा नाहक त्रास झाला.

याबाबत मी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव सादर केला असून त्याला तात्काळ मंजुरी मिळावी, अशी विनंती मी सभागृहाला केली आहे. खोटे ट्विट करणाऱ्या कंगनाला शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून भविष्यात कोणीही महाराष्ट्राची बदनामी करणार नाही, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

 

News English Summary: Shivsena MLA Pratap Sarnaik has filed a Privilege Motion against Bollywood Actress Kangana Ranaut. Sarnaik has also filed a defamation suit against those who spread false news through electronic, print and social media. MLA Pratap Saranaik himself gave this information to the media. He was speaking to the media on the sidelines of the Maharashtra Legislature Winter Session 2020.

News English Title: Shivsena MLA Pratap Sarnaik ove Pakistani credit card Kangana Ranaut Privilege motion in Maharashtra legislature winter session news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x