26 April 2024 6:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

पाकिस्तानचं स्वत:चेच जगात क्रेडीट नाही | त्यांचे क्रेडीट कार्ड घेऊन मी काय करणार?

Shivsena, MLA Pratap Sarnaik, Pakistani Credit Card

मुंबई, १४ डिसेंबर: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांनी अभिनेत्री कंगना रनौत (Bollywood Actress Kangana Ranaut) यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव (Privilege Motion) दाखल केला आहे. तसेच, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्धही सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वत: ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2020 (Maharashtra Legislature Winter Session 2020 आजपासून सुरु झाले. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या वेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, काही लोकांनी माझ्या विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार केला. खोट्या बातम्या परसवल्या. ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची राज्य आणि देशपातळीवर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. काही लोकांनी तर माझ्या घरी इडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड सापडल्याचा दावा केला. राफेलचे कागदपत्रं मिळाले, ट्रम्प यांच्यासोबत भागिदारी आणि काहींनी विदेशात निर्माण केलेल्या मालमत्तेचे दस्तऐवज सापडल्याचे म्हटले. परंतू, हे सर्व धादांत खोटे आहे, असे म्हणत आपल्यावरील सर्व आरोप प्रताप सरनाईक यांनी फेटाळून लावले.

माझ्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचे खोटे ट्विट कंगना रानौत हिने केले होते. त्यामुळे देशभरात माझी आणि माझ्या कुटुंबीयांची बदनामी झाली. माझ्या कुटुंबीयांना या सगळ्याचा नाहक त्रास झाला. पाकिस्तानसारख्या देशाचे स्वत:चेच जगात क्रेडीट नाही त्या देशाचे क्रेडीट कार्ड घेऊन मी काय करणार? असा सवालही उपस्थित केला. दरम्यान, कंगना रनौत यांनी केलेल्या ट्वीटच्या आधारे काही प्रसारमाध्यमांनी माझ्याबद्दल दिशाभूल करणारे वृत्त दिले. त्यांच्याबाबतही माझा हक्कभंग प्रस्ताव दाखल करुन घ्यावा, अशी विनंती आपण अध्यक्षांना केल्याचे सरनाईक म्हणाले.

याबाबत मी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव सादर केला असून त्याला तात्काळ मंजुरी मिळावी, अशी विनंती मी सभागृहाला केली आहे. खोटे ट्विट करणाऱ्या कंगनाला शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून भविष्यात कोणीही महाराष्ट्राची बदनामी करणार नाही, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

 

News English Summary: Kangana Ranaut had falsely tweeted that a Pakistani credit card was found in my house. This brought me and my family into disrepute across the country. My family suffered unnecessarily. What would I do with a credit card from a country like Pakistan that has no credit of its own in the world? This question was also raised. Meanwhile, based on a tweet by Kangana Ranaut, some media outlets gave misleading news about me. “I have requested the president to file a defamation suit against them as well,” Sarnaik said.

News English Title: Shivsena MLA Pratap Sarnaik gave clarifications over Pakistani Credit Card news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x