26 October 2021 3:54 AM
अँप डाउनलोड

MMRDA सुरक्षा रक्षक घोटाळा | सरनाईकांनी ५० टक्के नफा लाटल्याचा ईडीचा कोर्टात दावा?

Shivsena, MLA Pratap Sarnaik, Tops security fraud, ED Investigation

मुंबई, २७ नोव्हेंबर : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे अजून खोलात जाण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी शिवसेनेपुढे देखील राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच प्रताप सरनाईक हे पहिले रडारवर आले आहेत, पण त्यानंतर देखील शिवसेना शांत किंवा नमतं घेण्याच्या भूमिकेत गेल्यास केंद्रीय सत्ताधारी शिवसेनेच्या अनेक आमदारांच्या भोवती चौकशीचा सपाटा लावतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

MMRDA’च्या सुरक्षा पुरविरण्याच्या झालेल्या घोटाळ्यात (MMRDA Sucurity Supply Scam) तब्बल पन्नास टक्के नफा शिवसेना आमदार प्रताप सरानाईक यांनी लाटल्याचा दावा ईडीने थेट कोर्टात केल्याने शिवसेनेचे देखील धाबे दणाणण्याची शक्यता आहे. चौकशीतून आतापर्यंत नोंदविलेल्या जबाबातून ही माहिती समोर आल्याचे त्यांनी नमूद केले. यात, अमित चांडोळे हा यात महत्वाच्या म्हणजे मध्यस्थी म्हणून काम पहात प्रताप सरनाईक यांना पैसे पुरवत असल्याचे त्याने ईडीला सांगितले आहे. तेव्हापासून ईडी अधिक तपास करत आहे.

काल म्हणजे गुरूवारी अमितच्या कोठड़ीसाठी त्याला कोर्टात हजर केल्यानंतर ईडीकड़ून ही माहिती कोर्टाला देण्यात आली आहे. टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष महेश अय्यर यांनी केलेल्या तक्रारीनुसार (Tops Security Vice Chairman Mahesh Ayar), टॉप्स ग्रुपचे अध्यक्ष, प्रमोटर असलेल्या राहुल नंदा आणि अन्य सहा जणांनी टॉप्स ग्रुपच्या अकाउंट मधून भारतातल्या वेगवेगळ्या कंपनीत फंड ट्रान्सफर केला. पुढे हाच फंड स्वतःच्या फ़ायद्यासाठी रियल इस्टेट मध्ये गुंतवून १७५ कोटीचा ग़ैरव्यवहार केल्याचाआरोप आहे.

त्यांनी चौकशीत दिलेल्या जबाबानुसार, २०१४- १५ मध्ये टॉप्स ग्रुप सर्विस अँड सोल्यूशन कंपनीने एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पाच्या ठिकाणी महिन्याला ३०० ते ३५० सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट घेतले. यापैकी अवघे ७० टक्के सुरक्षा रक्षक तैनात करत, पूर्ण कामाचे पैसे घेण्यात येत होते. तसेच त्यावर पीएफ आणि ईएसआयसीचाही लाभ घेण्यात आला.

दरम्यान, सुरक्षा रक्षक सेवा पुरविणाऱ्या टॉप सिक्युरिटी या कंपनीचे मुख्यालय अंधेरी (Tops Secuirty Head Office at Andheri) येथे आहे. याअंतर्गत महाराष्ट्र तसेच देशात विविध ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवले जातात. सरनाईक कुटुंबाचे या कंपनीच्या प्रवर्तकांशी आर्थिक संबंध (MLA Pratap Sarnaik family relations with Tops Security) आहेत. त्याखेरीज कंपनीचे काही प्रवर्तक ब्रिटनमध्येही आहेत. तेथूनच रक्कम मुंबईत धाडण्यात आली व त्याचा गैरवापर झाला, असा ईडीला संशय आहे. याअंतर्गत मंगळवारी छापा टाकण्यात आला. प्रताप सरनाईक यांचे घर तसेच कार्यालय ठाण्यात आहे. या कार्यालय व घरावर हा छापा टाकण्यात आला. नगरसेवक असलेला त्यांचा लहान मुलगा पूर्वेश व स्वत: प्रताप सरनाईक हे एकत्र राहतात. तर मुख्यत: सरनाईक यांचे व्यवसाय पाहणारे विहंग ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहतात. त्या घरून मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ईडीचे पथक विहंग सरनाईक यांना मोटारीतून चौकशीसाठी घेऊन गेले. मात्र त्यांना कोठे नेले याबाबतची नेमकी माहिती परिसरात कुणालाच नव्हती.

 

News English Summary: Shiv Sena MLA Pratap Saranaik’s claim that fifty per cent profit was swindled in MMRDA’s security supply scam (MMRDA Security Supply Scam) is likely to hit the Shiv Sena as well. He said the information came from the inquiries so far. He told the ED that Amit Chandole was providing money to Pratap Saranaik, who was acting as a mediator. The ED has been investigating further since then.

News English Title: Shivsena MLA Pratap Sarnaik and Tops security fraud connections News updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x